Home महाराष्ट्र खळबळजनक :- पूजा चव्हाण पाठोपाठ टिकटॉक स्टार समीर गायकवाड यांनी केली आत्महत्या?

खळबळजनक :- पूजा चव्हाण पाठोपाठ टिकटॉक स्टार समीर गायकवाड यांनी केली आत्महत्या?

 

प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आली समोर टिकटॉक विश्वातील ऊभरता चेहरा पडद्याआड.

पुणे न्यूज नेटवर्क :-

सद्ध्या आत्महत्त्या करणाऱ्या टिकटॉक स्टार यांच्या भूमिकेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत असली तरी त्यांच्या आत्महत्त्यामागचे कारण प्रेमप्रकरण हेच असल्याने आजकालच्या प्रेमकहाण्यांत प्रेम कमी तर असंतोष जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे.अशाच असंतोषाला बळी पडले ते टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आणि आता समीर गायकवाड , समीर गायकवाड यांनी  रविवारी पुण्यातील वाघोली परिसरातील आपल्या घरात आत्महत्या केली.

घरातून बाहेर समीर का पडत नाही याची शंका आल्याने चुलत भावाने घरात डोकावून बघितले असता संध्याकाळी समीरचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेला आढळून आला. त्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. समीरच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, समीरने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी सर्वात आधी त्याचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड पोहोचला होता. या घटनेची माहिती लोणीकंद पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर समीरला खाली उतरले आणि नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. गेल्या काही दिवसांपासून तो त्रस्त होता, असे समजते. पूजा चव्हाण पाठोपाठ समीर गायकवाड या टिकटॉक स्टार यांच्या आत्महत्त्या यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Previous articleमनसे शहर अध्यक्ष यांच्यावरील गंभीर गुन्हे मागे घ्या- मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी यांची ग्रूह मंत्र्याकडे मागणी.
Next articleधक्कादायक :- लॉयड मेटल्स व्यवस्थापनावर पाणी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कार्यकारी अभियंत्याचे आदेश.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here