Home चंद्रपूर धक्कादायक :- लॉयड मेटल्स व्यवस्थापनावर पाणी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कार्यकारी...

धक्कादायक :- लॉयड मेटल्स व्यवस्थापनावर पाणी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कार्यकारी अभियंत्याचे आदेश.

 

संजीवणी पर्यावरण सामाजीक संस्था, चंद्रपुरच्या तक्रारी वरून पोलीस स्टेशन मधे होणार गुन्हे दाखल.

घूग्गूस प्रतिनिधी :-

मे. लॉयड मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमीटेड, घुग्घुस ही कंपनी पाणी चोरी करीत असल्यास कंपनीवर गुन्हा दाखल करुन कंपनी वर्धा नदीमधुन उचल करीत असलेला पाणी पुरवठा बंद करुन पाणी उचल स्थळी सिल लावण्याबाबतचे आदेश पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी उपविभाग यांना दिले असून आता लॉयड मेटल कंपनीवर गुन्हा दाखल होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

संजीवणी पर्यावरण सामाजीक संस्थाद्वारे मे. लॉयड मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमीटेड, घुग्घुस येथील कंपनीने ग्रामपंचायत नकोडा येथील बंद पडलेल्या ओपन कास्ट माईन्स लगत असलेल्या नदीच्या पात्रातील ओपन कास्ट माईन्समध्ये तलावातील पाणी पाईप लाईनद्वारे वापरीत असल्यामुळे पाणी कर चोरी करीत असल्याबाबतची तक्रार पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली होती त्यानुषंगाने उपविभागीय अभियंता यांना या संदर्भातील अहवाल अहवाल मागविण्यात आला होता. सादर करण्यांत आलेल्या अहवालामध्ये केलेल्या मौका चौकशी दरम्यान मे. लॉयड मेटल्स अंन्ड एनर्जी लिमीटेड, घुग्घुस जि.चंद्रपूर कंपनी नकोडा गावाजवळ बंद पडलेल्या ओपन कास्ट माईन्समध्ये पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी कंपनीने सबमसिंबल पंप व विद्युत पॅनल स्थापित केलेले असुन कंपनीद्वारे या स्थळावरुन प्रत्यक्षात पाणी उचल करीत असुन मागील ब-याच वर्षापासुन पाणी चोरी करीत असल्याचे व कंपनीच्या रसायनामुळे जलप्रदुषण होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

त्यामुळे सदर कंपनी पाणी चोरी करीत असल्याने त्याबाबतची खात्री करुन पाणी चोरी असेल तर नियमानुसार सदर कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच कंपनी चोरी करीत असलेल्या पाण्यावर शासकीय नियमानुसार दंडनिय दराने आकारणी करुन पाणीपट्टीची देयके सादर करण्यात यावी.
तसेच सदर कंपनीकडे माहे डिसेंबर//२०२० अखेर रु.१,४८,७४.९४०/- एवढी पाणीपट्टी थकबाकी कंपनीने मागील २ वर्षापासुन पाणीपट्टी थकबाकी रक्कम व चालू पाणीपट्टी देयक रक्कमेचा भरणा केला नाही त्यामुळे कंपनीशी प्रत्यक्ष संपर्क साधुन पाणीपट्टी वसुली करण्यात यावी. जर कंपनी पाणीपट्टी देयक रक्कमेचा भरण करीत नसेल तर कंपनीस होणारा पाणी पुरवठा बंद करण्याची कार्यवाही करण्यांत येऊन पाणी उचल स्थळी सिल लावण्यात यावे. व तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा असे आदेश पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी उपविभागीय अभियंता यांना दिल्याने लॉयड मेटल या कंपनीवर चोरीचे गुन्हे दाखल होऊन कोट्यवधी रुपयाची कर थकबाकी वसूल करण्यात येणार आहे.

Previous articleखळबळजनक :- पूजा चव्हाण पाठोपाठ टिकटॉक स्टार समीर गायकवाड यांनी केली आत्महत्या?
Next articleखळबळजनक:- दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here