Home महाराष्ट्र लक्षवेधक :- वसंत मोरे वंचित चा पहिला खासदार व्हायला निघाले नी डिपॉझिट...

लक्षवेधक :- वसंत मोरे वंचित चा पहिला खासदार व्हायला निघाले नी डिपॉझिट जप्त करून बसले?

मनसे सोडून गेल्यानं काय गती होते याचं ज्वलंत उदाहरणं म्हणजे वसंत मोरे.

पुणे न्यूज नेटवर्क :-

वंचित बहुजन आघाडीनं वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी दिली. वसंत मोरे हे मनसेचे फायरब्रँड नेते म्हणून प्रसिद्ध असल्याने ते चर्चेतला चेहरा होते, दरम्यान भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे अशी तिरंगी लढत होईल व वसंत मोरे चांगली टक्कर देईल अशी चर्चा रंगली होती, पण, वसंत मोरे तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेले. इतकंच नाहीतर या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं. त्यांना 50 हजार मतांचा आकडाही गाठता आला नाही, त्यांना फक्त 32 हजार मतांवर समाधान मानावं लागलं. महत्वाची बाब म्हणजे वंचित चा पहिला खासदार मी होईल ही वलग्ना करणारे वसंत मोरे यांची डिपॉझिट जप्त झाली आणि मनसे सोडली तर लोकं काय फजिती करतात हे त्यांना कळालं.

पुणेचे मनसे फायरब्रँड नेते म्हणून प्रसिद्धी मिळविणारे वसंत मोरे यांना लोकसभेचा खासदार व्हायचे एवढे डोहाळे लागले होते की त्यांना कुठल्याही परिस्थितीत खासदार व्हायचेच होते, मग त्यासाठी पक्ष सोडायला लागला तरी चालेल, त्यासाठी त्यांनी मनसे चा पहिला खासदार हा पुणेचा होईल अशी टॅग लाईन जोडून कॅम्पनिंग सुरु केलं, जिथे तिथे स्वतःला मनसेचा खासदार असं प्रस्तुत केलं आणि मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याकडे आपलं मत सुद्धा त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे व्यक्त करून लोकसभेची तयारी सुरु केली, पण मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही असं त्यांना वाटलं आणि त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणूक लढता येणार नाही हा अंदाज आल्याने त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत मनसे सोडली, दरम्यान त्यांना वाटतं होतं की कांग्रेस आपल्याला जवळ करेल, त्यासाठी त्यांनी कांग्रेस च्या मोठ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या, कांग्रेस कडून लोकसभेचे प्रबळ दावेदार असलेल्या आमदार रवींद्र धंगेकर यांना सुद्धा गरळ घातली पण जिथे कांग्रेसकडेच डझनभर नेते लोकसभा निवडणूकीच्या दावेदारीसाठी रांगेत होते तिथे बाहेरील पक्षाच्या मोरेंना कोण विचारणार होते, त्यामुळे सर्वच प्रयत्न फसले आणि शेवटी नेते आयात करणारा पक्ष असलेल्या वंचित कडे त्यांनी उमेदवारी मागितली

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं की “मी माझ्या पक्षाचं झाडं हे खडकावर लावलं आहे, त्याची फळं यायला उशीर लागेल पण जेंव्हा फळं येतील तेंव्हा ते रसाळ येथील, त्यामुळे थोडा संयम ठेवा,” पण मनसे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या नावाने मोठे झालेले पक्षाचे काही कार्यकर्ते हे स्वतःला राजसाहेब ठाकरे यांच्यापेक्षा मोठे समजायला लागले, त्यांना असं वाटायला लागलं की मी एवढी प्रसिद्धी मिळवली की बाकी पक्षाचे नेते आपल्याला संधी देईल आणि आम्ही आमदार खासदार होईल, पण ते चुकले, कारण त्यांना राजसाहेब ठाकरे हा ब्रॉन्ड कळलाच नाही, त्यांना वाटतं होतं आम्ही आहोत म्हणून मनसे आहे पण कार्यकर्ता हा पक्षांपेक्षा मोठा नसतो तर पक्ष त्याला मोठा करत असतो हे आता मनसे सोडून गेलेल्यांना नक्किच कळालं असेल, दरम्यान वसंत मोरे यांचा मानहानीकारक पराभव हा त्यांच्या अतीमहत्वाकांक्षामुळे झाला हे त्यांना मान्यच करावा लागेल, कारण मनसे सोडून रुपाली ठोंबरे गेल्या, नितीन नांदगावकर गेले यांनी मनसेत असताना प्रचंड प्रसिद्धी मिळवली होती मात्र मनसे सोडली आणि त्यांचे राजकारण संपले तसें आता वसंत मोरे यांचे सुद्धा राजकारण सपंल्यात जमा झाले आहे, कारण ते ज्या वंचीत बहुजन आघाडी पक्षात गेले त्या पक्षाची विश्वसनियता संपली आहे आणि लोकं त्या पक्षाला भाजप ची बी टीम म्हणून मतदान करत नाही हे लोकसभा निवडणूकतून स्पष्ट झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here