Home वरोरा सनसनिखेज :- सावंगी रेती घाटावर पाहणी करायला गेलेल्या एका पत्रकाराला रेती माफियांची...

सनसनिखेज :- सावंगी रेती घाटावर पाहणी करायला गेलेल्या एका पत्रकाराला रेती माफियांची बेदम मारहान?

मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांची रेती घाट धारकांकडून लाखोची हप्ता वसुली सुरु? शेतकऱ्यांच्या शेताचे नुकसान.

तालुका प्रतिनिधी:-

जात पडताळणी समितीने जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याने वादात सापडलेले मारेगाव येथील तहसीलदार उत्तम सयाजी निलावाड यांच्या अनेक चूरस कथा चर्चील्या जात आहे, दरम्यान सावंगी रेती घाट धाराकांकडून प्रतिमहा 20 लाख रुपये ते घेत असल्याची चर्चा सुरु असतानाच त्या रेती घाट धाराकांनी काही गुंड पोसले आहे, त्यातील रफिक नावाच्या गुंडानी एक पत्रकाराला जो रेती घाटावर माहिती घेण्यासाठी गेला असता त्यांचेवर हल्ला करून व त्याचे कपडे काढून बेदम मारहान केली असल्याचे बोलल्या जात आहे, ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्याला अर्धनग्न करून बेदम मारहाम करतानाचे फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरलं करण्याची धमकी सुद्धा पत्रकारला दिल्याची धक्कादायक व तितकीच सनसनीखेज माहिती समोर आली आहे. दरम्यान रेती माफि्यांची वाहने शेतकऱ्यांच्या शेतातून जोरजबरदस्तीने नेले जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, त्यावर तहसीलदार नि्लावाड गप्प का हा प्रश्न निर्माण होत आहे.

मारेगावचे तहसीलदार उत्तम सयाजी निलावाड यांच्या रक्त नातेसंबंधातील दत्तात्रय बळीराम निलावाड यांना तहसीलदार पदावर पदोन्नती देण्यात आली होती. मात्र यांच्याकडे बनावट जात वैधता प्रमाणपत्र असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. त्या अनुषंगाने पडताळणी समितीने सखोल तपास केला. यामध्ये रक्त नातेसंबंधातील अनेकाकडे बनावट जात वैधता प्रमाणपत्र असल्याचे पडताळणी समितीच्या निदर्शनास आले. त्या अनुषंगाने आदिवासी विभागाच्या किनवट येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने औरंगाबाद विभागातील बनावट जात वैधता प्रमाणपत्र धारक दत्तात्रय निलावाड यांच्या रक्त नातेसंबंधातील १७ जनांची जात वैधता प्रमाणपत्रे रद्द केले. यात मारेगावचे तहसिलदार याचा सुद्धा समावेश आहे.

सावंगी रेती घाटावर दररोज तहसीलदार निलावाड यांची हजेरी?

सावंगी रेती घाट हा रेती डेपो करिता व त्यातच घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना रेती पुरवठा कारण्याकरिता मंजूर करण्यात आला होता, परंतु तहसीलदार निलावाड यांच्या आशीर्वादाने सगळे नियम धाब्यावर बसवून रेती घाट (डेपो) संचालक प्रकाश पोपट, अन्सारी व मत्ते या तिघांई भागीदारांकडून जवळपास 20 लाख रुपये हप्ता त्यांना दिला जात असल्याची माहिती असून तो आकडा सुद्धा पुन्हा वाढवीला गेला असल्याची चर्चा आहे, चर्चा ही पण आहे की या सावंगी रेती घाटावर ते दररोज येत असतात व या घाटावर येणाऱ्या जवळपास 100 ते 130 ट्रक धारकांकडून प्रत्येकी 1000 तहसीलदार घेत असल्याची चर्चा असल्याने रेती माफि्यांची दादागिरी वाढली आहे व त्यातूनच एका पत्रकाराला मारहाण झाली असल्याने तहसीलदार उत्तम निलावाड यांची उच्चस्तरीय चौकशी करून हलचल रेकॉर्ड ची व घाट धारकांसोबत होत असलेल्या कॉल डिटेल्स ची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here