Home चंद्रपूर व्यक्तीविशेष :- नवनव्या आव्हानांना सामोरे जाणारे इंजि. दिलीप झाडे बनले युवकांचे आयकॉन.

व्यक्तीविशेष :- नवनव्या आव्हानांना सामोरे जाणारे इंजि. दिलीप झाडे बनले युवकांचे आयकॉन.

सामाजिक शैक्षणिक व औधोगिक क्षेत्रात नव्या भराऱ्या घेऊन युवकांपुढे ठेवला आदर्श.

चंद्रपूर :-

उच्च शिक्षण घेऊन अगदी आर्थिक विवंचनेत असताना सुद्धा जिल्ह्यातील कोरपणा सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात इंग्लिश मिडीयम मध्ये शाळा सुरु करणारे व स्कॉलर्स सर्च अकॅडमी च्या माध्यमातून गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांना कमी खर्चात इंग्रजी भाषेत शिक्षण्याची संधी उपलब्ध करून सामाजिक शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे इंजिनिअर दिलीप झाडे सर खरोखरच युवकांना प्रेरणा देणारे युवकांचे आयकॉन बनले आहे, नेहमीच नवनव्या आव्हानांना पेलत त्यांनी आपल्या कर्तृत्व, नेतृव व वक्तृत्व या गुणांनी अनेकांना भुरळ पाडली आहे.

इंजि दिलीप झाडे सर हे 15 जुलै 2001 ला इंजिनियरिंग फर्स्ट क्लास मध्ये 2001ला पास झाले होते. पण त्यांना लेक्चरर् पोस्ट साठी मॅनेजमेंट नी नाकारले. डिप्लोमा इंजिनिअरिंग त्यांनी 1992 साली केले होते. कमजोर आर्थिक बाजू मुळे त्यांना नंबर लागूनही इंजिनिअरिंग करता आले नाही. यामुळे अनेक खाजगी फॅक्टरीत काम केल्यानंतर त्यांनी 1996 ला एका संस्थेत स्थिर नोकरी पत्करली व 6 वर्षाचे गॅप नंतर 1998 लां नोकरी करीत असताना फुल टाईम इंजिनिअरिंग ला प्रवेश घेतला. दरम्यान मॅनेजमेंट नी त्यांना खूप सपोर्ट केला. त्यामुळेच त्यांचे बॅचलर ऑफ इंिनिअरिंग फर्स्ट क्लास मध्ये पूर्ण झाले. ते त्यावेळी आनंदी झाले पण नियती खूप काही वेगळे ठरविते व वेळच त्याचे उत्तर देत असते. दरम्यान त्यांनी संस्थेचा राजीनामा दिला त्यावेळी ते प्रचंड तणावात आले. पण त्यावेळी त्यांनी असाही सकारात्मक विचार केला की एक दिवस आपणच स्वबळावर उच्च दर्जाचे, लोकांसाठी, समाजासाठी, ग्रामीण मुलांसाठी चांगले काम केले तर हेच लोक आपल्याला फॉलो करेल…ह्या विचाराने त्यांच्यात प्रचंड विश्वास निर्माण झाला होता. व तो सकारात्मक विचार त्यांना प्रेरणादायी ठरला, मार्ग खुपचं कठीण होता…पण अश्यक्य नव्हता. कारण ते सामान्य शेतकऱ्याचा गावाकडील मुलगा म्हणून अनेक खाचखळगे पार करून आले होते. खरे तर प्रबळ इच्छाशक्ती ने जग जिंकता येते हे वाक्य त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले आणि त्याचं दिवसापासून सुरू झाली संघर्षाची नवी दुनिया.

अत्यंत गुप्त पद्धतीने, कुणालाही न सांगता..फारसा गवगवा न करता….दररोज सूक्ष्म प्लॅनिंग करीत, नोकरी न सोडता सुरू केला नव्या संघर्षाचा प्रवास. खरं तर जे काही होते चांगल्यासाठीच होते, कुणावरही अपयशाच खापर , कुणालाही दोष न देता त्यांचे काम सुरू झाले.. त्या दिवसापासून ते कधीच स्वत्थ बसले नाही. त्यांनी आता शिकले होते की नाकारणे म्हणजेच तुम्हाला जगासमोर सिद्ध करण्याची मोठी संधी आहेत. ह्याच तत्वाने काम सुरू केले. एक दिवस माझाच राहील व ज्यांनी नाकारले तेच तुमच्यावर प्रचंड प्रेम करेल. याच भावनेने ते काम करायचे. कधिही त्यांचे बद्धल चुकीचे बोलायचे नाही. होऊ शकते आपले काम, तत्व पटले नसेल कदाचित पण एक दिवस नक्की पटेल या भावनेने आपला शत्रूही आपल्याला मित्र बनविता आला पाहिजे तेव्हाच मोठे कार्य करता येते. हा विचार करून अत्यंत शुद्ध प्रामाणिक भावनेने त्यांचे काम सुरू झाले. हे दिवस म्हणजे त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी होती. ती त्यांनी स्वीकारली आणि सुरु झाला त्यांचा प्रचंड संघर्षाचा वेदनादायी प्रवास. या संघर्षात जिंकेल की नाही याचे उत्तर काळच देणार होता. प्रचंड रिस्क होती. कारण शारीरिक , कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय अशी ज्यावेळेस कुठलीच पार्श्वभुंमी नसते तेव्हा जिंकण्याची शास्वती फारच धूसर असते. पण स्वतःवरचा प्रचंड आत्मविश्वास, प्रामाणिकता व प्रबळ इच्छाशक्ती असेल तर सर्व काही शक्य होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीला सुध्धा लढाई किती अवघड होती हे माहीत असतांना सुद्धा त्यांनी पतीच्या निर्णयावर पूर्ण विश्वास होता.

दरम्यान नोव्हेंबर 2002 रोजी सर्च फाउंडेशन चंद्रपूर या संस्थेची त्यांनी स्थापना केली. आपली संस्था ग्रामीण भागात ग्रामीण मुलांच्या उन्नती साठीच कार्य करेल हे ठरवूनच 2002 मध्ये…2 एकर रोडवर कोरपना तेथे जमीन खरेदी केली. या वेळेस त्यांच्याकडे अनेक चांगले ऑप्शन असताना जिथे गरज आहेत कितीही संकटे आले तरी आपण ग्रामीण मुलांच्या पाठीशी, त्यांच्या भविष्यासाठी पूर्ण झोकून प्रयत्न करायचे हा संकल्प केला कारण ते सुध्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सामान्य शेतकरी कुटुंबातून आले होते. त्याचीच जाणीव ठेवून त्यांचेसाठीच जगायचे. ह्याच विचारातून झपाटल्यासारखे ते काम करीत गेले. सुरुवातीला 2004 मध्ये “विकासाच्या वाटा” या पुस्तकाची निर्मिती केली. कोरपना परिसरातील अनेक खेड्यात शैक्षणिक माहिती मार्गदर्शन, करिअर शिबिरे घेतली. 2004 मध्येच स्कॉलर्स सर्च अकॅडमी कोरपना या इमारतीची पायाभरणी सुरू केली आणि 2005 पासून पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यम शाळेची सुरवात केली. हे सर्व करीत असताना अनेक संकटे आली, आर्थिक मानसिक कौटुंबिक शारीरिक संकटातून अनेक वेळा जीवावर बेतले असतांना सुद्धा त्यांनी मार्ग बदलला नाही आणि मंत्रालयातून वर्ग 1 ते 8 ची परवानगी 2005 मध्ये आणली. हा काळ फारच अस्वस्थ करणारा होता. परवानगी रद्द झाली मग हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट….इत्यादी अनेक पायऱ्या चदून परवानगी वापस आणली. एकाचवेळी दोन्ही गोष्टी करीत असताना होणारी दमछाक शक्य नसल्याने त्यांनी खाजगी संस्थामधील कायम स्वरुपी नोकरीचा रीतसर राजीनामा 2006 र्ला दिला. दरम्यान शाळे सोबत स्कॉलर्स सर्च पॉलिटेक्निक/ मॅनेजमेंट चे NON-AICTE चे 5 अभ्यासक्रम 10 वर्षे चालविले. सोबतच 8 ते 12 पर्यंत शाळेला upgrade केले. शाळेसाठी पुन्हा 4 एकर जमीन वाढवून पूर्ण 6 एकर मध्ये प्रकल्प स्थापित केला. आदिवासी मुलांसाठी नामांकित निवासी शाळा परवानगी 2014-15 सुरू केली. करोना पूर्वी अत्यंत सुस्थितीत असलेला प्रकल्प करोनाच्य काळात प्रॉब्लेम मध्ये आला. भयंकर आर्थिक संकटाचा सामनाही करावा लागला पण आपल्या धेय्यावर ते ठाम राहिले आणि कधी हार मानली नाही.

अनेक कोर्ट कचेऱ्या, पोलिस स्टेशन, गद्दार , स्वार्थी , लोकांचाही सामना मोठ्या धर्याने त्यांनी केला पण यातून त्यांना अनेक गोष्टी शिकवून गेल्या आणि त्यांना पुन्हा प्रचंड परिपक्व बनविले. आज ज्यावेळेस ते मागे फिरून पाहतात तर आपण किती संकटाचा सामना करून ही मोठी लढाई जिंकली आहेत याचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो. याहिपलिकडे अगदी सामान्य गाव खेड्यातले मुले 80%, 90% चे वर मार्क्स घेतात मोठी स्वप्ने बघतात. हीच यांची यशाची मोठी पावती आहेत. या मुलांनाही अगदी माफक फीज मध्ये सर्व उच्च दर्जाचे शिक्षण अगदी त्यांचे जवळ मिळावे..चांगला नागरिक बनावा याच हेतूने.स्कॉलर्स सर्च ची निर्मिती त्यांनी केली. स्कॉलर्स सर्च ही कधीच माझी नव्हती तर लोकांसाठी, ग्रामीण मुलांसाठी उभारली होती असे ते मानतात, खरे तर ती देशाची ती संपत्ती आहेत आणि याच भावनेतून आर्थिक संकट आली असताना व करोडो रुपये मिळत असताना तो प्रस्ताव झिडकारून पुन्हा डौलाने संस्था ती उभी आहेस. कारण प्रचंड रक्त आटवून ती उभारली गेली आहे, खरे तर स्कॉलर्स हे त्यांचे हार्ट आहेत व येथील मुले त्यांच्या धमन्या आहेत असे ते मानतात, या संस्थेत आजमितीस 50 गावातील 700+ आदिवासी विद्यार्थी सहित अनिवासी व निवासी नामांकित इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षण घेत आहेत. दहावीच्या ९ बॅचेस 100% रिझल्ट व 12 वी सायन्स क्या 7 बॅचेस 100% रिझल्ट देणारी नामांकित शाळा कोरपना तालुक्याच्या ठिकाणी गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहेत. येथील शिक्षण घेणारे बहुसंख्य गरीब आदिवासी मुले, शेतकरी शेतमजूर यांची मुले आहेत. आज त्यांची टक्केवारी बघितली तर.. .शहरी मुलांपेक्षा उच्चतम आहेत. सहा एकर परिसरात 80000 स्वे फिट बांधकाम शाळा इमारत, हॉस्टेल, सभागृह, स्टेज, प्ले ग्राउंड, किचन शेड. स्मार्ट क्लासेस, कॉम्प्युटर लॅब, ग्रंथालय.आधुनिक सर्व सुविधेची सुसज्ज आहेत. स्टाफ ला पूर्ण ट्रेनिंग देऊनच येथे शिक्षण दिल्या जाते. आज खेड्यातील मुलांसाठी स्कॉलर्स सर्च म्हणजे प्रतिभावंत, ज्ञानवंत मुलांची प्रबोधिनी आहेत. अशा या संपूर्ण संघर्षातून इंजि. दिलीप झाडे यांनी युवकांना एक प्रेरणा दिली आहे की ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो तो आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहचतो आणि म्हणूनच इंजि दिलीप झाडे ध्येयवेड्या युवकांचे आयकॉन झाले आहे असेच म्हणावे लागेल, आज त्यांचा वाढदिवस आहे, परमेश्वर त्यांना पुन्हा अभूतपूर्व कार्य करण्यासाठी शक्ती देवो हीच प्रार्थना व पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here