वरोरा तालुक्यात PWD च्या रेती घाटातून जेसीबी ने रेती उपसा? लपाछपीचा डाव खेळतंय कोण?
चंद्रपूर /वरोरा :-
जिल्ह्यात रेती घाट किमान ऑक्टोबर नोव्हेंबर ला नाहीतर किमान जानेवारी पर्यंत तरी लिलाव व्हायला हवे होते पण रेती माफियाचे कारणामे आणि प्रशासनाचा मूक पाठिंबा यामुळे न्यायालयाच्या वादात रेती घाट लिलाव झाले नाही त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला कारण जी रेती सहज प्रती हायवा 15 ते 20 हजार रुपये खर्चून मिळायचा तो तब्बल 45 ते 50 हजारावर गेला आणि घरकुल करिता तर रेती घेणे तर कठीण होऊन बसलं होतं, मात्र आता जिल्ह्यात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रेती घाट लिलावाची प्रक्रिया पार पडली खरी पण रेती घाटातून 10 जून पर्यंतच रेती चा उपसा करायचा आहें आणि तो सुद्धा जेसीबी आणि पोकलेनं मशीन न लावता, पण मग मजूर लावून किती रेती उपसा होईल हा संशोधणाचा विषय असून पावसाळ्याच्या तोंडावर रेती घाट घेणारे तोंडावर आपटणार की फायद्यात राहणार? हा प्रश्न सर्वत्र चर्चील्या जातं आहें.
रेती घाट आपल्यालाच मिळाला पाहिजे यासाठी या धंद्यात असणाऱ्यांनी आपले राजकीय वजन वापरले व रेती घाट मिळविले कारण कमी काळात पैसे लावून पटीने पैसे कामाविण्याचा हा धंदा जोरात सुरु आहें, मात्र कधी कधी काही महसूल अधिकाऱ्यांच्या तानाशाहीमुळे अंगलट येऊ शकतो जसा की 2021-22 मध्ये मूल तालुक्यातील रेती घाट धाराकांच्या अंगलट आले होते. पण यावेळी परिस्थिती अत्यंत बिकट असून 10 दिवसात नेमकी काय किमया होईल हे सांगता येत नाही आणि जे काही होईल ते दाखवता पण येत नाही, आता मात्र पत्रकारांचे राजकीय नेते कार्यकर्ते यांचे लक्ष या रेती घाट धारकांच्या हालचालीवर असून कोट्यावधी रुपये भरून रेती घाट लिलाव घेण्याच्या या धंद्यात वांदे तर होणार नाही ना या संभ्रमात रेती घाट धारक आहें.
वरोरा तालुक्यात तुराणा रेती घाटाची चर्चा?
तालुक्यातील तुराणा रेती घाट हा PWD च्या कंत्राटदार यांना मिळाला आहें मात्र इथून PWD च्या बांधकामाच्या नावावर खाजगी बांधकाम करण्यास रेती वापरली जातं असल्याची माहिती आहें, सपन डे नावाच्या कंत्राटदार हा रेती घाट चालवत असल्याची वरकरणी माहिती असली तरी मुख्य सूत्रधार कोण आहेत याबद्दल गुप्तता आहें, मात्र या रेती घाटात जेसीबी पोकलेन मशीन टाकून रेतीचा उपसा होतं आहें आणि महसूल अधिकाऱ्यांच्या देखरेखित होतं असल्याची चर्चा होतं असल्याने लपवछापवी चा डाव कोण खेळतंय हे लवकरच समोर येणार आहें.