Home वरोरा दखलपात्र :- सावंगी रेती घाटावरून हजारो ब्रास अवैध रेती उत्खनन करून वरोरा...

दखलपात्र :- सावंगी रेती घाटावरून हजारो ब्रास अवैध रेती उत्खनन करून वरोरा तालुक्यात विक्री?

तहसीलदार उत्तम निलावाड यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष, रॉयल्टी चा मोठा घोळ.

माढेळी :-

यवतमाळ वर्धा जिल्ह्यातील काही रेती डेपो हे तेथील तहसीलदार यांच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने जोमात सुरु असून ती रेती चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात चढ्या भावाने विकल्या जात आहे, अशातच यवतमाळ वर्धा जिल्ह्यातील संगम असलेल्या नदी पात्रातून पोकलेनं मशीन द्वारे रोज हजारो ब्रास रेतीचे अवैध रेती उत्खनन होत असतांना सुद्धा तहसीलदार उत्तम निलावाड यांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केल्याने राष्ट्रीय संपत्तीची चोरी करण्यास सहकार्य करणाऱ्या त्या तहसीलदार यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

सावंगी संगम येथील रेती घाटावर शकील मिस्त्री प्रकाश पोपट व मत्ते नामक व्यक्ती यांना रेती डेपो मिळाल्याची चर्चा असून ते सर्व नियम धाब्यावर बसवून अवैधरित्या रेती उत्खनन करीत असल्याने व कोट्यावधी रुपयाची रेती रॉयल्टीचा घोळ करून खुलेआम वरोरा तालुक्यात व इतर ठिकाणी विकत असल्याने या रेती घाटातून रेती डेपोवर रेती नेण्याची प्रक्रिया व ऑनलाईन बुकिंग याची चौकशी करून राष्ट्रीय संपत्तीची चोरी होत असल्याने दोषीवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here