Home चंद्रपूर खळबळजनक :- ब्रम्हपुरी तालुक्यात हळदा घाटातील हजारो ब्रासचा रेती स्टॉक शिल्लक कसा...

खळबळजनक :- ब्रम्हपुरी तालुक्यात हळदा घाटातील हजारो ब्रासचा रेती स्टॉक शिल्लक कसा ?

मुद्दत संपल्यानंतर हजारो ब्रास रेती नदी घाटातून स्टॉक करणाऱी ती नागपूरची पार्टी कोण? नदी पात्रातून रेती उत्खननाची प्रशासनाने परवानगी दिली ?

ब्रम्हपुरी / चंद्रपूर :-

ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा रेती घाटातून हजारो ब्रास रेती उत्खनन करून त्यांचा नदी परिसरात रेती स्टॉक करणारे नागपूर येथील व्यापारी व त्यांना साथ देणाऱ्या स्थानिक रेती विक्रेत्यांनी जणू जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कायमस्वरूपी रेती साठा करण्याची परवानगी दिली की काय अशी शंका येत असून हळदा रेती घाट परिसरात किमान 25 हजार ब्रास पेक्षा जास्त रेती स्टॉक केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे, दरम्यान पत्रकार मंडळी हा रेती स्टॉक पाहण्यासाठी मोकास्थळी गेला असता तिथे उपस्थित सगळे ट्रक ट्रॅक्टर ड्राइवर व स्थानिक दहा ते बारा कर्मचारी तिथून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे, ह्या रेती साठ्यांचा मालक कोण याबद्दल उपस्थितांना विचारले असता कुणीही उत्तर द्यायला तयार नसल्याने हे मोठे स्कॅण्डल असल्याची शंका येत आहे.

जिल्ह्यातील रेती घाटाच्या संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या माध्यमातून मागील वर्षीच्या 10 आक्टोबर 2023 पर्यंत रेती साठा उचलण्याचे व जर तो रेती साठा उचलला नाही तर तो रेती साठा स्थानिक तहसीलदार यांच्या माध्यमातून जप्त कारण्याचे आदेश देण्यात आले होते, यावेळी किती रेती साठा शिल्लक आहे त्यांचा तपशील पण जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करा अन्यथा आपणावर पण कार्यवाही होईल असा इशारा देणारा आदेश अप्पर जिल्हाधिकारी यांनी 30 सप्टेंबर 2023 ला काढला होता पण स्वतः अप्पर जिल्हाधिकारी यांनी स्वतःच्याच आदेशाची भंग करून सन 31 डिसेंबर 2023 पर्यंत रेती साठा उचलण्याची परवानगी दिली तर निवडणूकीच्या काळात 2024 ला पण एक वेळा नियोजित जागेवर रेती साठा शिल्लक नसताना रेती स्टॉक उचलण्याची परवानगी दिल्या गेली जी बेकायदेशीर व घटनाबाह्य होती मात्र याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे एकच उत्तर आहे ते म्हणजे रेती घाट धारकांनी रेती साठा उचलला नव्हता, पण मग प्रश्न असा पडतो की ज्याअर्थी जिल्हाधिकारी यांनी स्वतः तहसीलदार यांना शिल्लक रेती साठा संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते ते आदेश तहसीलदार यांनी पाळले नसावे किंव्हा मोबदल्यात कुणाचं तरी भलं झालं असावं अशी शंका येत आहे. दरम्यान आजही रेती स्टॉक ची परवानगी नसताना 10 हजार ब्रास पेक्षा जास्त रेती साठा हअप्पर जिल्हाधिकारी किंव्हा खनिकर्म अधिकारी यांच्या आशीर्वादाने सुरु आहे का? की स्थानिक राजकीय पुढारी यांच्या आशिर्वादाणे सुरु आहे हे कळायला मार्ग नाही, या संदर्भात लवकरच सणसनिखेज माहिती समोर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here