Home महाराष्ट्र आश्चर्यचं :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका निर्णयाने महाराष्ट्रात खळबळ का...

आश्चर्यचं :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका निर्णयाने महाराष्ट्रात खळबळ का ?

उद्धव ठाकरे यांचं बेगडी हिंदुत्व यावर प्रहार करणारे राज ठाकरे भाजप सोबत गेल्यास फायदा कुणाला?

मुबंई वार्ता :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि भाजप नेते अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केले, मात्र लोकसभा निवडणुकीत मनसेला किती जागा मिळतील यावर स्पष्ट मत समोर आले नाही, ते दोन दिवसात समोर येईलच, परंतु राजसाहेब ठाकरे हे भाजप मध्ये जाणार तर त्यांनी भाजपवर आजपर्यंत केलेल्या त्या टिकांचे काय? याविषयी प्रसारमाध्यमावर चर्चा सुरु आहे, त्यात मनसेच्या अठराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या प्रदीर्घ भाषणात काही सूचक वक्तव्ये केली होती त्याचा आधार घेत “मी दुसऱ्यांची पोरं अंगा खांद्यावर खेळवणार नाही.” या वाक्याचा वेगळा अर्थ काढत महायुतीत शिंदे अजित पवार असल्याने त्यातून राज ठाकरे आता नेमकी कोणाची मुलं अंगा-खांद्यावर खेळवतील याविषयी पत्रकार टीका करतांना दिसत आहे. खरं तर कांग्रेस राष्ट्रवादी सोबत मुख्यमंत्री पदाच्या लालशेने गेलेल्या उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी कधीही प्रश्न विचारला नाही की तुम्ही हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली का दिली? एकीकडे आम्ही हिंदुत्ववादी म्हणायचे आणि दुसरीकडे हिंदुत्वविरोधात काम करणाऱ्यांसोबत आघाडी करायची मग उद्धव ठाकरेचे हे बेगडी हिंदुत्व पत्रकारांना दिसत नाही का? याचे आश्चर्य वाटते. महत्वाची बाब म्हणजे बाळासाहेबांचे खरे हिंदुत्ववादी विचार मांडणारे आणि सडेतोड भूमिका घेऊन विरोधकांना तोंडघशी पाडणारे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बेगडी हिंदुत्वाची अनेकदा खिल्ली उडवली आहे.

मनसेचा 18 वा वर्धापन दिन नाशिक शहरात झाला त्यावेळी राज ठाकरे म्हणाले होते, “कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा. मला स्वतःची पोरं अंगा खांद्यावर खेळवायची आहेत. मी दुसऱ्यांची पोरं अंगा खांद्यावर खेळवणार नाही. महाराष्ट्रात आपणच सत्तेवर येऊ.” दरम्यान राज ठाकरे यांनी ज्या भारतीय जनता पक्षावर इतर राजकीय पक्ष व नेत्यांची तोडफोड आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला बाधा आणल्याचा आरोप दहा विसवांपूर्वी केला होता. आता त्याच महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय राज ठाकरे घेतील का? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला, खरं तर राज ठाकरे यांनी कुण्या पक्षातील आमदार खासदार फोडले नाही किंव्हा चोरले नाही तर भाजप सोबत युती कारण्यामागे शिवसेनेचा जो मुंबई ठाणे पुणे आणि नाशिक या मोठ्या शहरात स्पेस निर्माण झाला तो भरून काढून मनसेने आपले राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्लान केला आहे आणि ही प्रत्येक पक्षाची रनणिती असतें. यात कुणाची मुलं अंगाखांद्यावर खेळवायची हा विषयच उद्भवत नाही.

राज ठाकरे यांना जनतेनी अजून ओळखले नाही.

भारतीय राजकारणात राज ठाकरे हे असे नेते आहेत की ते सगळ्या राजकारण्यांना पुरुन उरेल, त्यांच्याकडे दुरदृष्टी आहे, सामाजिक सांस्कृतीक व शैक्षणिक परिवर्तन यासह राज्याचा विकास घडविण्याची त्यांची काल्पकता त्याच्या विकास आराखड्यात स्पष्ट दिसते, मराठी माणसासाठी लढाणारा लढवंय्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यासाठी त्यांच्यावर आंदोलनाच्या 100 पेक्षा जास्त पोलीस केसेस आहे, पण जर उद्धव ठाकरे यांचा विचार केला तर त्यांच्यावर कुठल्याही आंदोलनाच्या पोलीस केसेस नाही कारण त्यांनी कधी आंदोलनच केले नाही, नव्हे त्यांची राज्यातील जनतेविषयी कधी त्यांनी भूमिकाचं मांडली नाही ही वस्तुस्थिती आहे, कारण उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांकडून राजकीय सत्ता ही वारस हक्कानं मिळाली पण राज ठाकरे यांनी स्वतःच्या प्रयत्नाने आणि संघर्षातून आपला पक्ष उभा केला हे राज्यातील जनतेने समजून घ्यायला हवे.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की तुम्ही संयम पाळा मी तुम्हांला सत्तेपर्यंत पोहचवून देईल, तुमच्यामधूनच कुणी नगरसेवक असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, सभापती व आमदार खासदार असेल, यानंतर आपली सत्ता येईल म्हणजे येईलच हा माझा तुम्हांला शब्द आहे. कदाचित राज ठाकरे यांना यामागील गुपित कळालं असेल कारण त्यांनी काही वर्षांपूर्वी भाषणात बोललेले शब्द खरे होतात आणि पुढे काय होईल हे ते निश्चित सांगतात त्यामुळे ते दुरदृष्टीचे नेते आहेत आणि या महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यास ते सक्षम आहेत पण महाराष्ट्रातील जनतेने त्यांना समजून घ्यायला हवे, एकेकाळी भाजप ही शिवसेनेच्या बळावर महाराष्ट्रात मोठी झाली हा इतिहास आहे कारण एका विचारांचे दोन पक्ष जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा त्यात संख्याबळ वाढत असतें आणि म्हणून राज ठाकरे यांनी भाजप सोबत जाण्याचा जो निर्णय घेतला त्यात राज्याच हितच आहे, शिवाय मराठी माणसाला पुन्हा चांगले दिवस येईल अशी आशा या निमित्यानं निर्माण झाली आहे.

Previous articleचंद्रपूर-वणी-आर्णी या क्षेत्रातून काँग्रेस तर्फे प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेचे तिकीट फायनल
Next articleधक्कादायक :- चंद्रपूर लोकसभेत उमेदवारीवरून वरिष्ठ्यांचे धानोरकर, वडेट्टीवारावर धक्कातंत्र?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here