Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्रपूर लोकसभेत उमेदवारीवरून वरिष्ठ्यांचे धानोरकर, वडेट्टीवारावर धक्कातंत्र?

धक्कादायक :- चंद्रपूर लोकसभेत उमेदवारीवरून वरिष्ठ्यांचे धानोरकर, वडेट्टीवारावर धक्कातंत्र?

ऐन वेळेवर उमेदवार बदलीचे 2019 चे संकेत, शिवानी ला वगळून विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब की पुन्हा प्रतिभा धानोरकर?

चंद्रपूर :-

मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कांग्रेस ने सुरुवातीला जाहीर केलेले दोन उमेदवार बदलले हा इतिहास पाहता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे, दरम्यान शिवानी वडेट्टीवार यांचा पत्ता कट झाला असून जर विजय वडेट्टीवार लढत असेल तर त्यांना उमेदवारी देऊ अन्यथा प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देऊ हे धक्कातंत्र कांग्रेस कमेटीने चालवले असल्याने तासातासाने दिल्लीत राजकीय स्थिती बदलत आहे, यात कधी प्रतिभा धानोरकर तर कधी विजय वडेट्टीवार यांच्या नावाने प्रसारमाध्यमात राजकीय बातम्या हवा गरम करत आहे, “रुको जरा अभी तो क्लायमेट अभी बाकी है” अशी म्हणण्याची वेळ सर्वावर येतांना दिसत आहे. या संदर्भातील ग्राउंड रिपोर्ट बघण्यासाठी व नक्की काय होणार आणि कुणाला उमेदवारी मिळेल याबद्दल सर्वांच्या नजरा टीव्ही न्यूज चैनेलच्या बातम्याकडे वळताना दिसत आहे, पण काल रात्री उशिरा आलेल्या बातम्यावरून वडेट्टीवार यांचे नाव फायनल झाल्याची माहिती समोर येत आहे, दरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार टक्कर कोण देऊ शकते या बद्दल विचार केला तर विजय वडेट्टीवार यांचे नाव अगदी समोर येत आहे.

मागील 2019 च्या निवडणुकीत जे राजकीय समीकरण बनले आणि कांग्रेस चे बाळू धानोरकर निवडून आले, त्याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे, कारण तेंव्हा जी परिस्थिती होती ती वेगळी होती, त्यात हंसराज अहिर यांच्या विरोधात जनमत होतं आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी गुप्तपणे छुपा पाठिंबा देत धानोरकर यांच्यामागे ताकत उभी केली होती, शिवाय आमदार विजय वडेट्टीवार यांचं नियोजन आणि सगळ्या आयुधांचा वापर करून सोबतच सामाजिक इंजिनिअरिंगचा फार्मुला जुळवून चंद्रपूर जिल्ह्यातील चारही विधानासभा क्षेत्रात त्यांनी कांग्रेसला बढत मिळवून दिली होती, परंतु त्यावेळी संघटितपणे लढणाऱ्या कांग्रेसमध्ये आज दुफळी आहे आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पक्षातील नेत्यावर आरोप लावून माझ्या पतीला त्यांनीच मारले असा जो गौप्यस्फ़ोट केला तो कांग्रेसमध्ये अंतर्गत शीतयुद्ध असल्याचा संकेत आहे, त्यांचा रोख हा विजय वडेट्टीवार यांच्यावर आहे, त्यामुळे बलाढ्य असणाऱ्या भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवर यांच्या समोर ताकतीने उभा राहणारा व शेवटच्या क्षणापर्यंत टिकणारा उमेदवार कांग्रेस ला यावेळी द्यावा लागेल आणि त्यात विजय वडेट्टीवार यांच्यासारखा दुसरा उमेदवार होऊ शकत नाही, राजकीय कौशल्य वापरून भल्याभल्याना तोंडाघशी पाडणारे व स्वतःचा मतदार संघ नसताना वेगवेगळ्या मतदार संघातून निवडून येण्याचा मान मिळविणारे वडेट्टीवार यांचेच नाव समोर येत आहे, भाजप च्या निवडणूकीच्या राननीतीला भेदण्याचे सामर्थ्य विजय वडेट्टीवार यांच्यातच आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात रननीती आखली आहे त्यावरून वडेट्टीवार यांचे पारडे जड आहे, पण अखेर पर्यंत कुणाला उमेदवारी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here