Home चंद्रपूर ब्रेकिंग :- कांग्रेस श्रेष्टींचे विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्याचे आदेश.

ब्रेकिंग :- कांग्रेस श्रेष्टींचे विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्याचे आदेश.

मात्र वडेट्टीवार यांचा स्वतः लढण्यास नकार, यामुळे आमदार प्रतिभा धानोरकर बनणार कांग्रेस उमेदवार?

चंद्रपूर :-

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून चढाओढ सुरु आहे, ती अकल्पित असून आता ती शेवटच्या संघर्षात पोहचली आहे, कारण लोकसभेच्या उमेदवारी फार्म भरण्याची सुरुवात झाली आहे, दरम्यान चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात कांग्रेस उमेदवार कोण होईल याबद्दल क्षणाक्षणात राजकीय वातावरण उन्हाळ्याच्या या तापमानात पुन्हा तापायला लागले आहे. प्रतिभा धानोरकर विरुद्ध शिवानी विजय वडेट्टीवार यांच्यात उमेदवारीसाठी संघर्ष सुरु असला तरी विजय वडेट्टीवार यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे पण ही उमेदवारी घायची की नाही याबद्दल अजूनपर्यंत वडेट्टीवार यांनी पक्षाच्या कमेटीला संगितले नसल्याने व ते स्वतः लढण्यास इच्छुक नसल्याने ही उमेदवारी आमदार प्रतिभा धानोरकर यांना मिळण्याचा अंदाज वर्तवल्या जातं आहे, परंतु ऐन वेळी नेमकं काय घडणार हे सांगता येत नाही.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सर्वप्रथम 20 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. अशातच बुधवारी दिल्लीत काँग्रेसची कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून काँग्रेसकडून 7 जागेचे उमेदवार निश्चित झाले आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. ‘महाराष्ट्रातील 18-19 जागांवर चर्चा झाली आणि 12 जागा निश्चित झाल्या आहेत. आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक आहे. आमच्यात एक चर्चा बाकी आहे. ज्यात फायनल होईल आणि उद्या किंवा परवा आमच्या सर्व जागा जाहीर होतील’, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तर नाना पटोले यांना गोंदिया आणि विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूरमधून निवडणूक लढवण्याचे आदेश काँग्रेसच्या वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत. दरम्यान आपला पत्ता कट झाला असे समजताच आमदार प्रतिभा धानोरकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वरओक निवास्थानी भेट घेऊन मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे असा आग्रह धरली असल्याची सूत्रांची माहिती आहे.

काय केल्याने ही जागा आपल्याला राखता येईल, या चिंतेत काँग्रेसी नेत्यांना घाम फुटला आहे, कारण, भाजपाकडे विकासवीर म्हणून ख्याती प्राप्त केलेले सुधीर मुनगंटीवार यांचा झंझावात आहे. शिवाय ते जाती-पातीच्या राजकारणापलीकडचे एक विकासधार्जिणे नेते आहेत. त्यांच्यापुढे अशा स्थितीत काँग्रेस एकसंधपणे सामोरे जाऊ शकेल का?अशी शंका या साऱ्या घडामोडींमुळे कांग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपुढे उभी ठाकली आहे. जवळपास अशीच स्थिती २०१९ च्याही निवडणुकीत होती. सुरुवातीला नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या मुलाचे नाव काँग्रेसने या मतदार संघाच्या उमेदवारीसाठी पुढे केले होते. पण भाजपाचे हंसराज अहिर यांच्यापुढे त्यांचा टिकाव लागणार नाही म्हणून काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी ‘भाऊ, हे विशाल मुत्तेमवार कोण रे’, ‘आम्हाला असे पार्सल नको’ असे बोलायला सुरुवात केली होती. त्यानंतर हे नाव मागे पडले आणि अशोक चव्हाण-मुकुल वासनिक यांच्यातील वादाच्या पर्यावसनाने विनायक बांगडे यांचे नाव पुढे आले. तेही आर्थिकदृष्ट्या टिकणार नाही, अशी ओरड स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आणि कंटाळून बांगडे यांनी आपली उमेदवारी सोडली. शेवटी बाळू धानोरकर यांनी काँग्रेसचे मैदान सांभाळले. कारण, त्यांनी तेवढ्यासाठीच तत्कालीन शिवसेना सोडली होती. आज प्रतिभा धानोरकर यांना विरोध करणारे विजय वडेट्टीवार यांनीच २०१९ च्या निवडणुकीत बाळू धानोरकर यांना पुढे आणले होते. शिवाय त्यांच्या उमेदवारीसाठी वरिष्ठांशी ते भांडले होते. दरम्यान बाळू धानोरकर यांना निवडून आणण्याच्या महत्वपूर्ण चढाओढीत विजय वडेट्टीवार यांची साथ असल्याने बाळू धानोरकर यांना विजय मिळाला होता.

प्रतिभा धानोरकर यांची काय आहे कमजोरी? पत्रक काढून का वडेट्टीवार यांना का दिली धमकी?

लोकसभा निवडणूकीच्या रानधुमाळीत आमदार प्रतिभा धनोरकर यांनी पक्षांतर्गत वाद पेटवला आहे, त्यांनी प्रसारमध्यमाना बोलताना माझ्या “पतीचा जीव पक्षातील काही नेत्यामुळे झाला आणि माझ्यामागेही ते लागले आहे, पण मी माझा जीव जाऊ देणार नाही,” असे बोलून त्यांनी खळबळ उडवून दिली खरी, पण त्यामुळे कांग्रेस चा मोठा गट आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात झाला आहे, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या काही समर्थकाकडून पत्रक काढून वडेट्टीवार यांना “चुकीला माफी नाही” असे पत्रक काढून पुनः बडेट्टीवार यांचा राग ओढवून घेतला आहे, राजकारणात अंतर्गत विरोध असतो पण तो प्रसारामध्यमातून जाहीर करणे म्हणजे स्वतःची कमजोरी दाखवण्यासारखे आहे, दरम्यान मूल येथे सीडीसीसी बैंक चे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर झालेला गोळीबार आणि त्यात बाळू धानोरकर समर्थक राजीव यादव यांचा असलेला सहभाग राजकीय गुंडगिरीला आमंत्रण देणारा प्रसंग होता आणि त्याविषयीं दिवंगत खासदार धानोरकर यांना जबाबदार धरले गेल्याची चर्चा ह्या सर्व धानोरकर परिवाराला कमजोर करणाऱ्या आहे, त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीत मूल बल्लारापूर विधानसभा क्षेत्रातून 30 हजार पेक्षा जास्त मतदान कांग्रेस ला लोकसभेत मिळाले होते त्याची पूर्तता यावेळी होणार नसल्याची चिन्हे दिसत आहे, शिवाय पक्षांर्गत विरोधात पण यावेळी जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात मिळालेली बढत कमी करण्याच्या मानसिकतेत असेल असे चित्र दिसत आहे, एकूणच सुधीर मुनगंटीवार यांना खरेच आमदार प्रतिभा धानोरकर टक्कर देणार का,? हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here