Home चंद्रपूर राजकीय कट्टा :- ती कुठली कुणबी समाज संघटना आहे, चुकीला माफी नाही...

राजकीय कट्टा :- ती कुठली कुणबी समाज संघटना आहे, चुकीला माफी नाही म्हणणारी ?

कांग्रेस मधील कुणबी समाजाच्या नेत्यांनी त्या व्हायरलं पत्राचा घेतला समाचार,

प्रतिभा धानोरकर समर्थक यांच्याकडून कुणबी समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न हाणून पाडणार.

चंद्रपूर :-

केवळ एका व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी अख्या समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न “चुकीला माफी नाही.” हे पत्रक काढून प्रसारामाध्यमात व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांचा कुणबी समाज संघटनेशी काहीही संबंध नाही आणि धानोरकर यांच्या पाठीमागे असणाऱी ती कुठली कुणबी समाज संघटना आहे? त्याचाही शोध लागला पाहिजे अशी मागणी कांग्रेस च्या कुणबी समाजाच्या नेत्यानी एंडी हॉटेल मध्ये पत्रकार परिषद घेऊन केली, त्यावेळी माजी खासदार नरेश पुगालिया यांचे उदाहरणं देण्यात आले, अल्पसंख्यांक समाजाच्या पुगालिया या नेत्यांना कांग्रेस ने उमेदवारी दिली होती, त्यामुळे कांग्रेस मध्ये जातं महत्वाची नाही हे स्पष्ट आहे त्यामुळेच त्या व्हायरलं “चुकीला माफी नाही,” पत्रकाचा कुणबी समाजाशी व कुणबी संघटनाशी काहीही संबंध नाही असे पत्रकार परिषदेत कांग्रेस नेत्यांनाकडून स्पष्ट करण्यात आले,

देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मागील काही दिवसांपासून कुणवी समाजाच्या नावावर राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर समस्त कुणबी समाजाच्या नावाने एक पत्र अलीकडेच सोशल मीडियावर वायरल करण्यात आले आहे. “चुकीला माफी नाही” या शीर्षकाखाली हे पत्र व्हायरल करण्यात आले. या पत्रातून आमदार प्रतिभा धानोरकर यांचा लोकसभा मतदारसंघावर कसा अधिकार आहे हे दाखवण्यात आले. समाजाच्या नावावर भावनिक आवाहन करण्यात आले. या पत्रात त्यांनाच उमेदवारी मिळावी या हेतूने ते पत्र त्यांनीच कार्यकर्त्यांमार्फतीने वायरल केल्याचे नाकारता येत नाही असा आरोप उपस्थित कांग्रेस च्या कुणबी नेत्यांकडून करण्यात आला,

या पत्राचा विचार केला तर कुणबी समाज संघटनेच्या वतीने कधीही राजकारणात असे दावे केले जात नाही. जिल्ह्यात कुणबी समाजाची कुणबी समाज संघटना म्हणून एक स्वतंत्र यंत्रणा आहे. एक व्यवस्था आहे. ही व्यवस्था जिल्ह्यातील कानाकोप‌ऱ्यात पोहोचलेली आहे. कुणबी समाज संघटनेला जर प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी मिळावी, असे वाटले असते तर कुणबी समाज संघटनेने यादृष्टीने काँग्रेस पक्षाकडे अधिकृत पत्रव्यवहार केला असता, मात्र समस्त कुणबी समाजाच्या नावावर असे बोगस पत्र तयार करून ते व्हायरल केले नसते. समस्त कुणबी समाजाच्या नावाचा वापर करून काढलेल्या पत्राने कुणबी समाजाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कुणबी समाजाने कधीही कोणत्याही राजकीय पक्षाला कुणाला उमेदवारी द्यावी, असं कधीही पत्र काढलेलं नाही. यापूर्वी 2019 मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर मैदानात आले. त्यावेळी सुद्धा कुणबी समाजाने अशा पद्धतीने कधीही पत्र काढले नव्हते. त्यांना उमेदवारी द्यावी अथवा देऊ नये या संदर्भातही कुणबी समाजाने कधी वाच्यता केली नाही. समाजातील घटक अनेक पक्षात कार्यकर्ते आहे. कार्यकर्ते म्हणून त्यांनी केलेली मागणी म्हणजे कुणबी समाजाची मागणी होय, असे समजणे चुकीचे आहे. समाज एक स्वतंत्ररित्या काम करतो. कुणी समाजाला गृहीत धरून कुणी आपला राजकीय फायदा घेत असेल तर समस्त कुणबी समाज संघटनेच्या वतीने आम्ही त्या कृतीचा निषेध करतो. कुणबी समाजाचे नेते स्वर्गीय एडवोकेट मोरेश्वरराव टेंभुर्डे यांनी बाळूभाऊ धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी अतोनात प्रयत्न केले होते. त्यांना उमेदवारी मिळाली आणि ते जिंकले. त्यानंतर प्रतिभाताई धानोरकर या सुद्धा आमदार झाल्या. मागील चार वर्षात या दाम्पत्याने समाजाची कोणती परतफेड केली हे त्यांनीच सांगावे. उलट एडवोकेट मोरेश्वर टेंभुर्डे यांच्या आशीर्वादाने उमेदवारी मिळवीणाऱ्या धानोरकरांनी त्याच्याच कुटुंबियांप्रती जाहीर अपशब्द काढले. टेंभुर्डे साहेबांनी धानोरकर यांना पुढची लोकसभेची तिकीट देऊ नये, यासाठी स्वतः सोनिया गांधी यांना पत्र पाठवले होते, ही बाब मसमाज अजून विसरलेला नाही. मागील पाच वर्षात केवळ समाजाचे राजकारण एवढच धोरण धानोरकर दांपत्याने ठेवलं होतं आणि आता या समाजाच्या बळावर त्या उमेदवारीची दावेदारी करीत आहे हे कुठेतरी चुकत आहे. कुणबी समाजाला गृहीत धरून प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारी मागू नये. उमेदवारी मिळविणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. यात समाजाला गोवू नये. समाज म्हणजे पार्टी नव्हे. हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे असे डोज सुद्धा धानोरकर यांना पाजन्यात आले. याप्रसंगी बबन बांगडे, बबनराव फंड, डॉ. विजय देवतळे, डॉ. सुरेश महाकुलकार, नंदू नागरकर, सुनीता लोढिया, प्रवीण पडवेकर, अनुश्री दहेगावकर, संगीता भोयर, शालिनी भगत, वसंता देशमुख व इतर असंख्य कांग्रेस आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

काय आहे व्हायरलं पत्रकात?

चुकीला

माफी नाही,

बंधू-भगिनींनो, नमस्कार.

मा. श्री. विजय वडेट्टीवार साहेब स्वतः कुणबी समाजाच्या मतांवर वर्षानुवर्षे ब्रह्मपुरी विधानसभाच नाही तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात राजकारण करत आहेत. विदर्भातील सर्व कुणबी समाज त्यांच्यामागे नेहमीच उभा राहिला आहे. फक्त राजकारण आणि निवडणुकीत नाही तर इतर सामाजिक चळवळीत सुद्धा सकल कुणबी समाजाने वडेट्टीवार साहेबांना कायम पाठिंबा दिला आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून याच कुणबी समाजातील एका विधवा महिला लोकप्रतिनिधीच्या हक्काच्या जागेवर आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न वडेट्टीवार साहेब करत आहेत. तर माझं वडेट्टीवार साहेबांना एकच सांगणं आहे की साहेब, सर्वसामान्य लोकांना राजकारण कळत नसेल पण त्यांना सामाजिक नीती नियम कळतात. लोकांना राजकारणातील डावपेच समजत नसतील पण त्यांना लोकांची नियत कळते.

आजवर भारत देशात आमदार, खासदारांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना त्याठिकाणी उमेदवारी दिली जात असते. पण आपल्या चंद्रपूरमध्ये कुणबी समाजाच्या एका दिवंगत खासदाराच्या पत्नीच्या हक्काच्या उमेदवारीच्या आड येऊन वडेट्टीवार साहेब आपण आमच्या मनातून उतरला आहात. ज्या थाळीत खाल्लं तिथेच घाण करण्याच्या या कृत्यांबद्दल समस्त कुणबी समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही जर एका विधवा महिलेला अश्या प्रकारचा राजकीय त्रास देणार असाल तर आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कुणबी समाज मतदार तुम्हाला तुमची जागा आगामी विधानसभा निवडणुकीत दाखवून देऊ !

समस्त कुणबी समाज, जिल्हा चंद्रपूर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here