Home महाराष्ट्र धक्कादायक :- प्रकाश आंबेडकर पुन्हा 2019 प्रमाणे राजकीय चित्रपटाचा ‘फ्लॅशबॅक’ आघाडीला दाखविणार?

धक्कादायक :- प्रकाश आंबेडकर पुन्हा 2019 प्रमाणे राजकीय चित्रपटाचा ‘फ्लॅशबॅक’ आघाडीला दाखविणार?

भाजप ची बी टीम म्हणून महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी पुन्हा करणार महाविकास आघाडी चा खेळ?

न्यूज नेटवर्क :-

वंचित बहुजन आघाडी चे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी आणि खास करून काँग्रेससोबत ‘फिगर गेम’ खेळतायत का?, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना एक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी मविआत काँग्रेसच्या वाट्याला येत असलेल्या जागांपैकी सात जागांवर त्यांना बिनशर्त पाठींब्याचा प्रस्ताव दिला आहे. एकीकडे आंबेडकरांच्या महाविकास आघाडीसोबत जाण्यावर प्रश्नचिन्ह लागलेलं असतांना आंबेडकरांचा हा नवा प्रस्ताव सर्वांनाच बुचकळ्यात पाडणारा आहे. दरम्यान वेळोवेळी भाजप ची बी टीम म्हणून वंचित बहुजन आघाडी कडे राज्यातील जनता बघत असल्याची चर्चा असतांना आता शेवटच्या क्षणी आघाडीत बिघाडी च्या कारणावरून प्रकाश आंबेडकर फिगर गेम च्या चक्रव्युहात कांग्रेस ला फसवून पुन्हा 2019 प्रमाणे राजकीय चित्रपटाचा ‘क्लायमॅक्स’ दाखविणार का? या बद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आपली युती झाली म्हणून जाहीर करायचे, कांग्रेस च्या सात जागावर पाठिंबा द्यायचा, दुसरीकडे मात्र शरद पवार यांच्यावर टीका करायची आणि मी महाविकास आघाडी सोबतच असल्याची माहिती प्रसारामाध्यमाना द्यायची ही खेळी महाविकास आघाडीत बिघाडी करणारी आहे हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत ओबीसी संघटना सोबत सुद्धा बोलणी सुरु असून राज्यातील सर्व लोकसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी चे संभावित उमेदवार ठरवून त्यांना पक्षाचा एबी फॉर्म ची व्यवस्था सुद्धा केली असल्याची चर्चा आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीच्या मंच्यावर जाऊन कांग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या सभेत आपली भूमिका मांडली खरी पण त्यांनी आपला भाजप कडे बार्गेनिंग पॉवर वापरून स्वतःचा सार्थ साधण्यासाठी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा ते ड्रामा तर करत नाही? हा प्रश्न उपस्थित होतं आहे.जाणार का? सध्या राज्याच्या राजकारणात गेल्या दोन महिन्यांपासून प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीत ‘हा खेळ आकड्यांचा’ ड्रामा सुरू आहे. मात्र, या आकड्यांचा खेळ सापशिडीसारखा गुंतागुंतीचा होत चालला आहे. याला कारण आहे, आंबेडकरांनी वेळोवेळी फेकलेलं जागांच्या आकड्यांचं जाळं.

आंबेडकरांचे प्रस्ताव आणि आकड्याचे काय आहे जाळे?

आंबेडकरांनी सर्वात आधी महाविकास आघाडीतील त्यांच्यासह चारही पक्षांनी प्रत्येकी 12 जागा लढवाव्यात हा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर त्यांच्या जागांच्या प्रस्तावाचे आकडे वेळोवेळी बदलत गेले. कधी ते 13 झाले, तर कधी 9 झाले. आता अगदी अलिकडे त्यांनी महाविकास आघाडीला 16 जागांचा नवा प्रस्ताव दिला होता. कधी जागांवर तर कधी महाविकास आघाडीच्या बैठकीच्या निमंत्रणावरून आंबेडकर आणि मविआत तणातणी झाली. 30 जानेवारीला आंबेडकरांचे प्रतिनिधी पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या बैठकीला गेले. मात्र, त्यानंतर तेथे त्यांच्या प्रतिनिधींना चांगली वागणूक न मिळाल्याचं सांगत त्यावर वाद झाले. त्यानंतरच्या दोन बैठकांना स्वत: आंबेडकर उपस्थित होते. मात्र, त्यातून आतापर्यंतही काहीच निष्पन्न झालं नाही. त्यामुळे मविआसोबतच्या सर्व बैठका निष्फळ ठरल्या व आता ऐन वेळेवर वंचित आपला 2019 सारखा गेम करतील अशी परिस्थिती दिसत आहे.

महाआघाडीतील वाटपाचा फॉर्म्युला ठरला

महाविकास आघाडीला आंबेडकर सोबत येतील याबद्दल शंका आहे. त्यामुळे महाआघाडीतील तीन पक्षांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम केला आहे. यात ठाकरेंच्या सेनेला 22, काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 असा फॉर्म्युला ठरला आहे. जर आंबेडकर मविआसोबत आले, तर हाच फॉर्म्युला सेनेला 20, काँग्रेसला 15,शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 9 आणि वंचित 4 असा ठरलाय. मात्र, वंचित चार जागांवर आघाडी करायला तयार नाही. त्यामुळेच मविआने आंबेडकरांना मंगळवारी संध्याकाळपर्यंत सोबत येण्यावर भूमिका स्पष्ट करण्याचा अल्टीमेटम दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, वंचितनं त्याचा इन्कार केला आहे. आंबेडकरांनी अलिकडे काँग्रेसवर शेलकी टीका केली, त्यानंतर त्यांनी आता काँग्रेसला दिलेला प्रस्ताव अतिशय गोंधळात टाकणारा आहे.

2019 च्या निवडणुकीतही आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीसाठी अशाच घटनाक्रमांचा ‘फ्लॅशबॅक’ घडला होता. या राजकीय चित्रपटाचा ‘क्लायमॅक्स’ 2019 मध्ये आघाडी न होण्यानं झाला होताव तो यावेळीही तसाच होणार का? असा प्रश्न उपस्थित होत असून तसेच संकेत मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here