Home Breaking News महत्वाची बातमी :- मनसेचा वर्धापनदिन सोहळा यावर्षी रद्द ? पक्षाची सदस्यता नोंदणी...

महत्वाची बातमी :- मनसेचा वर्धापनदिन सोहळा यावर्षी रद्द ? पक्षाची सदस्यता नोंदणी मात्र राज्यभर होणार.

 

मनसे नेते नितीन सरदेसाई यांची प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया.

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-

देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पक्षाचा वर्धापनदिन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्यातर्फे प्रसारमाध्यमां ना देण्यात आली आहे. दरम्यान, वर्धापनदिन सोहळा रद्द केला असला तरी राज्यभरात 9 मार्च रोजी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व फार्म भरून सदस्य नोंदणी केली जाणार असल्याची माहितीही मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि गर्दीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो हे लक्षात यंदा मनसेचा वर्धापनदिन सोहळ्याचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली त्याऐवजी 9 मार्च रोजी मनसेच्या वर्धापनदिनी राज्यभरात सदस्य नोंदणी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

Previous articleलक्षवेधी :- आमदार किशोर जोरगेवार यांचे राज्यपालांच्या अभिभाषणाच्या प्रस्तावाला समर्थन? मग वीज दरवाढीचा विरोध का नाही?
Next articleखुशखबर :- कशामुळे सोने झाले स्वस्त ? पुन्हा स्वस्त होण्याची चिन्हे आहेत का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here