Home Breaking News खुशखबर :- कशामुळे सोने झाले स्वस्त ? पुन्हा स्वस्त होण्याची चिन्हे आहेत...

खुशखबर :- कशामुळे सोने झाले स्वस्त ? पुन्हा स्वस्त होण्याची चिन्हे आहेत का?

 

सोन्याच्या दरात २१ टक्क्यांनी घसरण,सोन्याची चमक फिकी पडल्याने सोने व्यापारी मात्र चिंतेत?

न्यूज नेटवर्क :-

करोना संकटातून जागतिक अर्थव्यवस्था सावरत असल्याने सोन्याची चमक फिकी पडली आहे. मागील नऊ महिन्यात सोन्याच्या दरात २१ टक्के घसरण झाली आहे. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सोन्याचा भाव ४३००० रुपयांसमीप आला आहे. त्यामुळे सोने व्यापारी चिंतेत असल्याचे बोलल्या जात आहे.लसीकरणाने घेतलेला वेग आणि अर्थव्यवस्थेत झपाट्याने होत असलेली सुधारणा पाहता सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेत बॉण्ड यिल्डमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचा फायदा उचलत गुंतवणूकदारांनी अमेरिकन बॉण्ड मार्केटमध्ये खोऱ्याने पैसे गुंतवले आहेत. तसेच डॉलरचे मूल्य वधारले आहे. त्याचा परिणाम जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किमतीवर झाला आहे. सोन्याचा दर प्रती औंस १७०० डॉलरच्या खाली आला आहे.

‘एमसीएक्स’वर सोने विक्रमी पातळीच्या तुलनेत २१ टक्के घसरले आहेत. तर जागतिक कमॉडिटी बाजारात सोने जवळपास १५ टक्के स्वस्त झाले असून ते १७०० डॉलरच्या खाली आले आहे.

गुंतवणुकीतून स्थिर परतावा हवाय; जाणून घ्या कसा आहे डीएसपी फ्लोटर फंड मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये शुक्रवारी रात्री बाजार बंद होताना सोन्याचा भाव ९९ रुपयांनी किंचित वधारला आणि तो ४४६४० रुपयांवर बंद झाला. तत्पूर्वी त्याने दिवसभरात ४४२१७ रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती. एमसीएक्सवर शुक्रवारी एक किलो चांदीचा भाव ६५७१७ रुपयांवर बंद झाला. त्यात २०४ रुपयांची घसरण झाली होती. चांदीने दिवसभरात ६४८७५ रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती.

Previous articleमहत्वाची बातमी :- मनसेचा वर्धापनदिन सोहळा यावर्षी रद्द ? पक्षाची सदस्यता नोंदणी मात्र राज्यभर होणार.
Next articleअति दुःखद वार्ता :- लग्नाच्या एक महिन्याआधीच मुलीने संपवली जीवनयात्रा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here