Home क्राईम स्टोरी चिंताजनक :- अवैध रेती चोरी प्रकरणी महसूल विभागाचे काम पोलिसांना का करावे...

चिंताजनक :- अवैध रेती चोरी प्रकरणी महसूल विभागाचे काम पोलिसांना का करावे लागताहेत?

तहसीलदार अवैध उत्खनन व रेती माफियाना संरक्षण देऊन राष्ट्रीय संपत्ती ची चोरी करण्यास मदत करताहेत का? चिंताजनक बाब आली समोर.

वरोरा /भद्रावती :-

मागील काही वर्षांपासून वरोरा भद्रावती तालुक्यातील दोन्ही तहसीलदार यांचा प्रशासन व्यवस्था चालविण्याचा अंदाज बघितला तर येथील दोन्ही तहसीलदारांनी जनतेच्या हक्क अधिकाराला पायदळी तुडवून व अवैध मार्गाने शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणाऱ्या सावकार यांच्या बाजूने निर्णय करून प्रसंगी कायदा हातात घेऊन व सातबारे फेरफार करून आपल्या महाराष्ट्र नागरी सेवा शर्ती व अटी याचे उल्लंघन चालवलेले आहे, जनतेच्या प्रश्नांना व समस्यांना जबाबदेही असणाऱ्या या अधिकाऱ्यांनी जनतेच्या हक्क अधिकाराची पायमल्ली चालवलेली आहे, अर्थात रेती चोरीवर प्रतिबंध करण्याचे काम हे महसूल विभागाचे असतांना आता ते काम पोलिसांना करावे लागताहेत ही चिंताजनक बाब समोर येतांना दिसत आहे,

जेव्हापासून सहाय्यक पोलीस अधिक्षक, तथा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आयुष नोपानी व त्यानंतर नयोमी साटम यांचा कार्यकाळ सुरु झाला तेव्हापासून वरोरा भद्रावती मधील दोन्ही तहसीलदार यांनी अवैध उत्खनन व अवैध रेती माफियाना संरक्षण देण्याचे काम करून पोलिसांच्या कार्यवाहीकडे केवळ बघ्यांची भूमिका घेण्याचे काम केले असल्याचे दिसत आहे, ज्यांच्याकडून पैसे पोहचले नाही त्यांना मात्र स्वतः हे दोन्ही तहसीलदार रात्रीला सुद्धा कारवाई करण्यासाठी मिशनवर निघतात हे अनेक वेळा घडले असल्याची माहिती आहे. दरम्यान आता तहसीलदार यांच्या आशीर्वादानेचं अवैध रेती चोरी होतं असल्याने सहाय्यक पोलीस अधिक्षक, तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी रेती चोरावर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे, दिनांक २६/०४/२०२४ रोजी प्राप्त गोपनिय माहितीवरून नयोमी साटम, सहाय्यक पोलीस अधिक्षक, तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस कर्मचारी व पोलीस स्टेशन, वरोरा येथील सपोनि/विनोद जांभळे व त्यांचे सोबतचे पोलीस कर्मचारी यांचे संयुक्त विद्यमाने सकाळी ०९.०० वा. सुमारास मौजा तुळाणा आणि करंजी येथील वर्धा नदी पात्रातील रेती घाटावर छापा घालुन रेती व गौण खनिजाचे अवैद्य उत्खनन करणारे ५ ट्रॅक्टर सोबत जोडलेले ट्रॉलीसह ज्यात रेती भरून असलेले आणि ट्रॅक्टर धारक व चालकांनी एकमेकांसोबत घटनेदरम्यान संपर्क करणेकरीता वापरलेले ०३ मोबाईल फोन असा एकुण ३५,३८,०००/- रूपये (पस्तीस लाख अडोतीस हजार रूपये) चा मुद्देमाल जप्त केलेला असुन ट्रॅक्टर चालक आणि मालक-१) नितेश वामन पिंगे, २) मुकेश चांदेकर, ३) विजय आनंदराव मारेकर, ४) राजा थैम, ५) विकास जानकीराम पंधरे, ६) आसिफ थैम, ७) भालचंद्र महादेव पिंपळशेंडे, ८) राजु गंधारे, ९) संजय मारोती खांडेकर आणि १०) विक्की गंधारे, अशा एकुण १० आरोर्पीविरूध्द कलम ३७९,३४ भा.दं. वि. सहकलम ४८ महाराष्ट्र महसुल अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करन्यात आला आहे.

रेती घाट रेती उपसा करणेकरीता शासन स्तरावरून जिल्हाधिकारी, चंद्रपुर यांचे आदेशाने लीलाव झालेले नाही. तरी सुध्दा यातील आरोपींनी संगणमताने मोठया प्रमाणात रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टरसोबतचे ट्रॉलीमध्ये रेती भरतांना मिळुन आलेले आहेत. तसचे रेती तस्करांकडुन रात्री अपरात्री रेती भरलेले ट्रॅक्टर लोकवस्तीतुन भरधाव घेवुन जात असल्याने व वारंवार होत असलेले चोरटे रेती वाहतुकीचे वाहनांमुळे नदी पात्राची व रस्त्यांची दुरावस्था होत असल्यामुळे वरोरा येथील सामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत व स्वतः पुढे येवुन रेती तस्करांविरूध्द कार्यवाही करन्यास सहकार्य करीत आहेत. अशाच प्रकारे नागरिकांचे सहकार्यातुन नयोमी साटम, सहाय्यक पोलीस अधिक्षक, तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांनी कायदेशिर कार्यवाही केलेली आहे. सदर कार्यवाही करीता सपोनि/विनोद जांभळे तसेच किशोर बोढे, दिपक मोडक, विशाल राजुरकर, विठ्ठल काकडे आणि नितीन तुराळे अशा पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे. सदर प्रकरणात पुढील कार्यवाही करीता अहवाल महसुल विभागाकडे पाठविन्यात आला आहे. त्याचप्रमाणे भविष्यात रेती तरकरांकडुन अवैद्यरित्या रेती उत्खनन किंवा वाहतुक केल्यास कठोर कायदेशिर कार्यवाही करन्यात येईल, अशी चेतावणी पोलीस विभागाकडुन देण्यात आली आहे.

रेती व गौण खनिज चोरी करणारे राजकीय वरदस्त यामुळे निर्ढावले?

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मोठया प्रमाणात ज्या पद्धतीने अवैध गौण खनिज व रेती चोरी चे प्रकार सुरु आहे त्यांना राजकीय आशीर्वाद असल्याने व त्यांच्या माध्यमातून तहसीलदार यांना कंट्रोल करण्याचे काम सुरु असल्याने रेती व गौण खनिज चोरी चे प्रकार सुरु आहे, दरम्यान काही प्रकरणात तहसीलदार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सुद्धा तहसीलदार महोदय अगोदरच अवैध गौण खनिज व रेती चोरी करणाऱ्यांचे पाठीराखे असल्याने तक्रार करणाऱ्या सामाजिक राजकीय कार्यकर्त्याना उलट ते पुरावे मागत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे, म्हणजे चोरांना वाचविण्यासाठी स्वतः तहसीलदार हेच जबाबदारी घेत असल्याने ते पूर्णतः निर्ढावले दिसत आहे, मात्र सहाय्यक पोलीस अधीक्षक साटम यांच्या कर्तव्यदक्ष सेवेमुळे त्यांच्यावर होत असलेली कार्यवाई ही एक जमेची बाजू असून त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बचत होतांना दिसत आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here