Home Breaking News महाराष्ट्र दिनी चंद्रपूरवासियांसाठी सांस्कृतिक मेजवानी

महाराष्ट्र दिनी चंद्रपूरवासियांसाठी सांस्कृतिक मेजवानी

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सुमधुर गीतांच्या स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूर  :-  महाराष्ट्र दिनानिमित्य चंद्रपूर जिल्हा वासियांसाठी सांस्कृतिक मेजवानीचे आयोजन अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने १ मे २०२४ रोजी सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत चांदा क्लब ग्राउंडवर सुमधुर गीतांच्या स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे .

महाराष्ट्र दिनानिमित्य अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने चंद्रपूर जिल्हा वासियांसाठी आनंदाची मेजवानी आयोजित करण्यात आली असून सुर नवा ध्यास नवा, सा रे ग म प झी मराठी फेम, 57 व्या महाराष्ट्र राज्यात चित्रपट पुरस्कार विजेती , सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मधुरा कुंभार,  सारेगमप, इंडियन आयडल, सुर नवा ध्यास नवा फेम प्लेबॅक सिंगर प्रसेनजीत कोसंबी , द केरला स्टोरी प्लेबॅक सिंगर,

सुर नवा ध्यास नवा उपविजेती सारेगमप फेम अंशिका चोणकर, यांच्या उपस्थित सुमधुर गीतांच्या स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने सदर स्वरांजली कार्यक्रमाचा चंद्रपूरप्रेमींनी घ्यावा असे आवाहन मुख्य आयोजक अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठानचे महेश मेंढे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here