Home चंद्रपूर खळबळजनक :- आ.किशोर जोरगेवार यांच्या स्वीय सहाय्यकाचे प्रमाणपत्र बेकायदेशीर?

खळबळजनक :- आ.किशोर जोरगेवार यांच्या स्वीय सहाय्यकाचे प्रमाणपत्र बेकायदेशीर?

वैद्यकीय अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेल्या अपंग प्रमाणपत्राची चौकशी करून अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करा,

पत्रकार परिषदेत मनसेची मागणी.

चंद्रपूर :-

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे स्विय सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले सुबोध जुन्नावार यांना काही दिवसांपूर्वी एक आजार झाला होता. त्या दरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांचा आजार बरा झाला परंतु त्या आजाराच्या आधारावर जिल्हा सामान्य रुग्णालयातून बेकायदेशीरपणे आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून व वैद्यकीय अधिकारी डॉ.आंबटकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्यावर दबाव टाकून सुबोध सुनील जुन्नावार याला 42 टक्के अपंगत्व असल्याचे अस्थायी स्वरूपाचे तीन वर्षासाठी 10/1/2024 ला अपंग प्रमाणपत्र (mh1330619930218118) देण्यास भाग पाडले, दरम्यान ते एवढ्यावरच थांबले नाही तर या अपंग प्रमाणपत्राचा उपयोग करून त्यांनी विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थी म्हणून 11/3/2024 ला संजय गांधी निराधार योजनेच्या कमेटीसोबत हातमिळणी करून त्यांचा यादीत समावेश करवून घेतला व ते या योजनेचा लाभ पण घेत आहे. त्यामुळे अपंग प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ.आंबटकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्याच्या संपूर्ण कामकाजची चौकशी करून त्यांच्यावर निलंबानाची कारवाई करावी व कुठलीही शहानिशा न करता संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देणाऱ्या नायब तहसीलदार व त्या समितीतील अधिकारी पदाधिकारी व सदस यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत मनसेकडून करण्यात आली आहे.

संजय गांधी योजना समितीने दिनांक 11/ 3 /2024 ला सुबोध सुनील जुन्नावार यांना योजनेचा लाभ मिळवून देतांना कुठलीही शहानिशा न करता केवळ आमदार किशोर जोरगेवार यांचा स्वीय सहाय्यक आहे म्हणून त्यांना मान्यता दिली. एकीकडे कित्तेक वृद्ध, अपंग, विधवा व निराधार यांना संजय गांधी योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचे काम तहसील कार्यालयात स्थित समितीचे अधिकारी व पदाधिकारी करतात तर दुसरीकडे शिफारशीने आमदार यांच्या पगारी स्वीय सहाय्यक याला बेकायदेशीरपणे अपंग प्रमाणपत्र व संजय गांधी योजनेचा लाभ दिल्या जात आहे, यामुळे आजपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे व वैद्यकीय अधिकारी डॉ आंबटकर यांच्या माध्यमातून कित्तेक बोगस अपंग प्रमाणपत्र वाटले गेले असेल याचा नेम नाही. शिवाय संजय गांधी निराधार योजनेच्या कमेटीतील अधिकारी व पदाधिकारी यांनी कित्तेक बोगस लाभार्थी यांना लाभ मिळवून दिला असेल हे सांगता येत नाही असा संशय पण मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

लाखोंची मालमत्ता मग संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी कसा?

आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वीय सहाय्यक सुबोध सुनील जुन्नावार राहणार पठाणपुरा गेट जवळ चंद्रपूर यांची संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी म्हणून निवड करण्यासाठी तलाठी यांनी जो अहवाल सादर केला, त्यात सुबोध सुनील जुन्नावार यांची पत्नी व भाऊ हे खाजगी कॉॅम्पुटर ऑपरेटर आहेत व ते थ्री BHK फ्लॅट मध्ये राहतात असे नमूद केले आहे, अर्थात स्वतः आमदाराचे स्वीय सहाय्यक असलेले सुबोध यांना किमान 20 ते 25 हजार पगार मिळत असेल व पत्नी आणि भाऊ यांना किमान 15 -15 हजार रुपये पगार मिळत असेलच त्यामुळे ते खऱ्या arthane लाखोपतीचं आहे हे स्पष्ट आहे त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचे ते लाभार्थी बनू शकत नाही हे स्पष्ट आहे. आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वीय सहाय्यक सुबोध सुनील जुन्नावार यांना अपंग प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आंबटकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या कामकाजाची चौकशी करून त्यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात यावी व संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी ठरविणाऱ्या नायब तहसीलदार यांच्यासह कमेटीच्या अधिकारी पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून अटक करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना भ्रष्ट आरोग्य व तहसील प्रशासन यांच्या विरोधात मनसे स्टाईल आंदोलन करेल या दरम्यान काही अनुचित प्रकार घडला तर यासाठी आपण स्वतः जबाबदार असाल असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे, यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, रोजगार स्वयंरोजगार विभाग जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, शहर अध्यक्ष पियुष धुपे, अतुल दिघाडे,, वर्षा भोंबले इत्यादीची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here