Home भद्रावती अति दुःखद वार्ता :- लग्नाच्या एक महिन्याआधीच मुलीने संपवली जीवनयात्रा.

अति दुःखद वार्ता :- लग्नाच्या एक महिन्याआधीच मुलीने संपवली जीवनयात्रा.

 

वडिलांच्या आत्महत्ये नंतर मुलीने सुद्धा स्वतःला जाळून घेवून केलेली आत्महत्या वेदनादायी.

भद्रावती न्यूज नेटवर्क :-

सद्ध्या आत्महत्त्या करण्याचे सत्र सर्वत्र सुरू असून ग्रामीण भागात सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या सोबतच मुले मुली आत्महत्त्या करीत असल्याने हा प्रकार नेमका कशामुळे घडत आहे हे समजायला मार्ग नसून कान्सा येथील २२ वर्षीय कुमारिकेने लग्नाला एक महिना शिल्लक असताना स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची अतिशय दुःखद घटना शुक्रवारी घडली घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नीलिमा प्रमोद काकडे (रा.कान्सा) असे आत्महत्या करणाऱ्या कुमारिकेचे नाव आहे असून काही दिवसांपूर्वी नीलिमाचे साक्षगंध झाले होते. एका महिन्यावर लग्न आले असताना तिने राहत्या घरीच स्वत: जाळून घेतले. प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात तिला दाखल केले होते परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या आकस्मिक आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही नसले तरी १० वर्षांपूर्वी वडील प्रमोद काकडे यांनी सुद्धा कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली होती शिवाय पाच वर्षापूर्वी अपघातात भावाचा सुद्धा मृत्यू झाला आणि आता आई ही आपल्या एकुलत्या एक पोरीचा आधार घेऊन कशीबशी मजुरी करून जगत असताना पोरीने सुद्धा आत्महत्या केली असल्याने त्या आईच्या काळजाची काय अवस्था झाली असेल? हे न बोललेच बरे, मात्र लग्नाच्या बहूल्यावर चढण्याच्या अगदी एक महिन्या अगोदर मुलीने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या करणे म्हणजे काहीतरी मोठं संकट त्या मुलीवर कोसळल असाव अशी शक्यता असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here