Home वरोरा संतापजनक :- दहा हजार दे तरच गाडी सोडतो, अन्यथा गुन्हे दाखल करणार...

संतापजनक :- दहा हजार दे तरच गाडी सोडतो, अन्यथा गुन्हे दाखल करणार ?

शेगाव पोलीस स्टेशनं मध्ये पोलिसांचा एका दोनचाकी वाहन चालकांना इशारा.

रात्रीच्या 12 वाजेपर्यंत एका महिला व मुलीला ठेवले पोलीस स्टेशनं मध्ये, प्रकरण अंगलट येताच गाडीही सोडली

वरोरा प्रतिनिधी :-

शेगाव मार्गे पळसगाव कडे रात्रीला 9 ते 9.30 च्या दरम्यान येतांना एका दुचाकी वाहन धारकाला मेसा या गावाजवळ पोलीस काही लोकांचा झगडा सोडवत असल्याचे दिसले, दरम्यान पोलिसांची गाडी लाईट बंद करून मुख्य रस्त्यावर उभी असल्याने व समोरून एक दुचाकी गाडी येत असल्याने डोळे दीपले व दुचाकी चालकाला दिसले नसल्याने पोलिसांच्या गाडीला त्याची दुचाकी भिडली, दरम्यान त्या गाडीजवळ असलेल्या पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी दुचाकी वाहन धारकाला अडवले व त्याची गाडीची चाबी हिसकावून घेतली, तेंव्हा दुचाकी चालक हा साधाभोळा असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तू पोलिसांच्या गाडीला धडक दिली आता तू दहा हजार दे तरच गाडी सोडतो अन्यथा तुझ्यावर गुन्हे दाखल करू असा इशारा दिला, बिचारा दुचाकी चालक अत्यंत गरीब असल्याने त्याने त्यांच्या नातेवाईक यांना फोनवर ही गोस्ट सांगितली आणि दहा हजार पोलिसांना द्यावे लागते अन्यथा माझ्यावर ते गुन्हे दाखल करणार असे सांगितले, पण गरीब बिचाऱ्या दुचाकी धारक याला कुणीही मदत केली नाही, त्यामुळे तो त्याची बहीण व भाची असे तिघे शेगाव पोलीस स्टेशनं मध्ये अडकले, दरम्यान ज्या पोलिसांनी त्याची गाडी अडवली व पोलीस स्टेशनला लावली ते पोलीस स्टेशनं मधून निघून गेले, दरम्यान रात्रीच्या 11.00 वाजेपर्यंत वाट पाहता पाहता दुचाकी चालक व त्यांच्यासोबत असलेली महिला व मुलगी बिना जेवण उपाशी रात्रीला 11.20 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनं ला थांबले, त्यानंतर ते रात्रीला 11.20 वाजता पोलीस स्टेशनं मध्ये आले व त्यांनी तुझ्यावर आता गुन्हे दाखल करतो असे म्हणून त्या तिघांना पोलीस स्टेशनं मध्ये थांबण्यास सांगितले.

दरम्यान दहा हजार द्या तरच गाडी सोडतो असे म्हणणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांची नावे समोर आली नाही, त्यामुळे पत्रकारांनी ठाणेदार यादव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ठाणेदार यादव यांचे दोन्ही मोबाईल क्रमांक बंद होते व स्टेशनं डायरी वर एक महिला पोलीस कर्मचारी होती, त्यानंतर ज्यांनी दुचाकी पकडली ते पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस स्टेशनं मध्ये रात्रीला 11.20 ला आले आणि दुचाकी चालक यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची पुन्हा धमकी दिली, पण गुन्हे दाखल झाले तरीही महिलेला व मुलीला रात्री पोलीस स्टेशन मध्ये ठेवणे कायद्याने गुन्हा आहे पण तरीही शेगाव पोलिसांनी त्यांना रात्रीला 12.00 वाजेपर्यंत ठेवले, मात्र ही बाब पत्रकारांना माहीत झाल्याने व दुचाकी चालकासोबत एक महिला व मुलगी असतांना ज्या पद्धतीने दहा हजार रुपयाच्या लाचे करिता पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनं मध्ये अक्षरशः डांबून ठेवल्यासारखे पोलीस स्टेशनं आवरात ठेवले ही गोस्ट सर्वत्र पसरली त्यामुळे त्या संबंधित पोलिसांनी शेवटी दुचाकी चालक याला एका कोऱ्या कागदावर सही करून सोडले व सकाळी आठ वाजता गाडीच्या शोरून मध्ये ये अन्यथा गुन्हे दाखल करू असा इशारा दिला, खरं तर महिला व अल्पवयीन मुलीला रात्री पोलीस स्टेशनं मध्ये ठेवणे व त्यांना रात्री त्यांच्या घरापर्यंत न सोडणे हा सुद्धा एक अपराध आहे आणि पोलिसांच्या “सद्राक्षणाय खलनिग्रहाणाय” या ब्रीद वाक्याला काळिमा फासणारा प्रसंग आहे, यामुळे या प्रकरणी ठाणेदार यादब यांच्या माध्यमातून संबंधित पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्याचार कारवाई करने आवश्यक आहे, वाहनाला चालन करून ते सोडून देता आले असतें पण दहा हजाराची लाच मागून ती देत नाही म्हणून एका महिलेला व मुलीला वेठीस धरण्याचा शेगाव पोलीस स्टेशनं चा हा कुठला कायदा आहे हे कळायला मार्ग नसून या प्रकरणी त्या दोषी पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here