Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्रपूरातील एका मुकबधिर वसतीगृहात अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार?

धक्कादायक :- चंद्रपूरातील एका मुकबधिर वसतीगृहात अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार?

याप्रकरणी वसतिगृह प्रमुख यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष यांच्यावर देखील गुन्हा दाखल.

क्राईम वार्ता :-

चंद्रपुर शहरातील एका मुकबधिर शाळेत वसतीगृहात प्रमुखांनी एका मूकबधिर विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी वसतिगृह प्रमुख यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती आहे, आगस्ट 2022 ला शहरातील रमाबाई आश्रम शाळेत अशाच एका अल्पवयीन मुलीवर शाळेच्या अधीक्षकांनी बलात्कार केल्याची घटना घडली होती व आता चक्क मुकबधिर अल्पवायीन मुलीवर बलात्कार केल्या गेला असल्याने शाळेत आपल्या मुली पाठवयाच्या कशा असा प्रश्न पालकांना पडला आहे.

बल्लारापूर रस्त्यानी असलेल्या मुकबधिर शाळा व वस्तीगृहात विद्यार्थिनी एकांतात असल्याचं दिसताच वसतीगृह प्रमुखांनी जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केला असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. वसतीगृह प्रमुखानं लैंगिक अत्याचार केल्याचं पीडित विद्यार्थिनीनं तिच्या शिक्षिकेला सांगितलं पण ही बाब उघड झाल्यास आपल्यावर सुद्धा हे प्रकरण शेकणार म्हणून त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक यांना वसतिगृह प्रमुखांनी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची बाब सांगितली परंतु शाळा प्रशासनानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र, पीडित विद्यार्थिनी आणि तिचे कुटुंबीय तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेत २५ एप्रिलला लेखी तक्रार दिली होती, हे प्रकरण शहर पोलीस स्टेशनं अंतर्गत येत असल्याने पोलिसांनी तपास करून याप्रकरणी वसतिगृह प्रमुख यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे आरोपींवर अट्रॉसिटी कायद्यातील कलम तीन, बालकांचं लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमचे कलम १७, कलम २१, कलम ९ (फ), कलम ८ व कलम ९ (क), कलम ३५४, कलम ३५४-ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.प्रकरणाचा तपास सुरू असून अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर चंद्रपुर शहरातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आता या प्रकरणी मुख्याध्यापक यांच्यासह संस्थाचालक अध्यक्ष सचिव यांच्यावर काय कारवाई होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here