Home चंद्रपूर दुर्दैवी:- जीवंत जाणिवेचा दर्दी पत्रकार हरवला…पत्रकार कुमार फुलमाळी यांचे निधन.

दुर्दैवी:- जीवंत जाणिवेचा दर्दी पत्रकार हरवला…पत्रकार कुमार फुलमाळी यांचे निधन.

बिकट परिस्थितीत आपल्या कणखर लेखणीतून समाजकार्य कार्य करणाऱ्या फुलमाळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

बल्लारपूर प्रतिनिधी:-

विविध प्रादेशिक वृत्तपत्रातून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरु करणाऱ्या,अत्यन्त बिकट परिस्थितीतही त्यांनी पत्रकारितेत कधीच तडजोड स्वीकारली नाही.दरम्यानच्या काळात दैनिक सामना या ज्वलंत वृत्तपत्रात त्यांनी तालुका प्रतिनिधी म्हणून अनेक वर्षे पत्रकारिता केली.जब्बार पटेल निर्देशित डॉ.बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटच्या संबंधाने कुमार फुलमाळी यांनी “तिने कानातील डुल विकून ‘बाबा’ पहिला” ही बातमी सामनाच्या सर्व एडिशन ला फ्रंट पेज ला लागली होती…
त्यांच्या सामाजिक जाणिवा आणि पत्रकारितेतील प्रगल्भता एवढी श्रेष्ठ होती की,त्या वेळेस ते अनेक नव्या पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन करायचे. बुद्ध,फुले,कबीर,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांनी ते ओतप्रोत होते.आयुष्याच्या अत्यंत खरतड प्रवासातून त्यांनी मार्ग काढत व्यवसाया कडे आपला कल केला.सुरवातीला केबल नेटवर्क च्या माध्यमातून त्यांनी व्यवसायात प्रवेश केला.त्यानंतर ते लाकूड व्यवसायात उतरले.आणि एक यशस्वी पत्रकार कसा यशस्वी व्यवसायिक होऊ शकतो;याची मुहूर्तमेळ त्यांनी घालून दिली.

गेली महिना भरा पासून त्यांना कोरोनाने पछाडले. त्यांना पोद्दार यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पण तब्बेतीत सुधारणा न झाल्याने त्यांना 2 जून रोजी हैद्राबाद येथे हलवण्यात आले होते. आज उपचारा दरम्यान सायंकाळी 4 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या मागे पत्नी दोन मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाल्याची,तथा जिवंत जाणिवेचा पत्रकार हरवल्याची प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्यातील पत्रकार संघाकडून व्यक्त होत आहे.पुरोगामी पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,प्रेस क्लब आणि विविध पत्रकार संघटनांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here