Home चंद्रपूर झटका :- वीज ग्राहकांची लूट करणारी महावितरण कंपनी थकीत बिल धारकांची वीज...

झटका :- वीज ग्राहकांची लूट करणारी महावितरण कंपनी थकीत बिल धारकांची वीज तोडणार?

 

आमदार जोरगेवारसह बाकी लोकप्रतिनिधी कुठे झोपलेले? काहीच कळेना!

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील आमदार किशोर जोरगेवार हे वीज ग्राहकांना २०० युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्याच्या एका मुद्द्यावर निवडून आले होते. मात्र जसे निवडून आले तसे ते आपले जनतेला दिलेले आश्वासन विसरले जणू “भाड मे जाए जनता अपना काम बनता” या आपल्या राजकीय धूर्त नीतीचा त्यांनी अवलंब केला आहे. महत्वाची बाब म्हणजे किशोर जोरगेवार हे “बालिश बहु बायकांत बडबडला” अशा विशिष्ट बालिश मानसिकतेत होते कारण त्यांना राजकीय समज नव्हती किंव्हा त्यांच शिक्षण त्या दर्जाचं नव्हत म्हणून त्यांनी वीज ग्राहकांना दिलेला शब्द पाळला नाही असे आपण म्हणू शकतो.पण ते समजदार बाकी आमदार खासदार आहेत तरी कुठे? खरं तर कोरोना काळातील वीज ग्राहकांचे १८ ते १९ टक्के अतिरिक्त वीज दरवाढ व त्यावर कहर म्हणजे थकीत वीज बिलांवर वाढवलेले १८ टक्के व्याज यावर तरी आमदार खासदार यांनीकाही तरी तोडगा काढायला हवा होता पण ते सुद्धा गप्प आहे. लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारा जनतेचा प्रतिनिधी असतो पण तो आता व्यापारी झाला आहे, कारण त्यांना जनतेच्या त्या मतांवर आपली संपती वाढवायची आहे असेच एकूण चित्र दिसत आहे.

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्य, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व पथदिव्यांची मार्च 2020 ते मार्च 2021 या मागील वर्शाची 275 कोटी 36 लाख व मार्च 2021- 2022 या चालू वर्शाची मे 2021 पर्यंत 71 कोटी 29 लाख अशी एकंदरीत थकबाकी 346 कोटी 65 लाखाच्या घरात पोहेाचल्याने थकबाकीदारांविरोधात वाजपुरवठा खंडीत करण्याची धडक मोहिम राबविण्यात येत असून थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत वीजबिल त्वरीत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे केले आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार खासदार यांनी जनतेला आधार देण्यासाठी घरगुती व वाणिज्य वापरासाठीचे जे अवाढव्य वीज बिल आहे त्यावर महावितरण कंपनीला धारेवर धरायला हवे कारण जिथे घरात कमावणारा घरी होता ज्यांची दुकाने बंद होती त्यांच्याकडे पैसे येणार कुठून? याचा विचार कोण करणार?

आता थकीत वीज बिल ग्राहकांची वीज जोडणी तोडणार असल्याची बातमी महावितरण कंपनीने ग्राहकांना नोटीस पाठवून पोहचवली आहे. जिथे सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था मोठे ऊद्दोग यांची वीज कापली तर काही वावगे नाही पण जिथे रोजगारच नाही काम धंदे बंद आहे दुकाने बंद आहे असे वीज ग्राहकांनी पैसे आणायचे कुठून? हा गंभीर प्रश्न आहे. या वीज ग्राहकांच्या समस्या लोकप्रतिनिधी यांनी त्वरित सोडवणे गरजेचे आहे अन्यथा वीज ग्राहक हतबल व हताश होऊन कुणी आत्महत्या पण करू शकतात अशी गंभीर स्थिती दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here