Home वरोरा आरोग्य वार्ता :- कोसरसार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक सिकलसेल दिवस साजरा.

आरोग्य वार्ता :- कोसरसार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक सिकलसेल दिवस साजरा.

 

खांबाडा मनोहर खिरडकर :-

कोसरसार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १९ जुन ला जागतिक सिकलसेल दिवस आयोजित करण्यात आला. यावेळी ५० रूग्णांची तपासणी करण्यात करण्यात आली.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमा नुसार जिल्हा आरोग्य अधिकारी, तथा तालुका आरोग्य अधिकारी, यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधिकारी आशिष देवतळे, यांच्या उपस्थितीत कोसरसार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात “जागतीक सिकलसेल दिवस कार्यक्रम पार पडला. यावेळी ५० रूग्णांच्या तपासणी दरम्यान एकही रूग्ण पाॅझीटीव्ह आलेला नाही.यावेळी आरोग्य सहाय्यक बालपणे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ शैलेश सहारे, आरोग्य सेवक अमित चिवंडे, आरोग्य परिचारिका गाणार सिस्टर,पोळे सिस्टर,पपीता जगदाळे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here