Home चंद्रपूर हिंदूंच्या सणावर बंदी घालणाऱ्या सरकार विरोधात मनसेचे ढोल बजाओ आंदोलन.

हिंदूंच्या सणावर बंदी घालणाऱ्या सरकार विरोधात मनसेचे ढोल बजाओ आंदोलन.

 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी दोन वाजता महाराष्ट्र सैनिक करणार सरकारचा ढोल वाजवून निषेध.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे हिंदूच्या सण उत्सवावरील बंदी घालून महाराष्ट्रातील संस्कृती आणि परंपरे वर घाला घालत आहे. दहीहंडी व गणेश उत्सवास जर मनाई असेल तर मग राजकीय मोर्चे यात्रा आणि जल्लोषात राजकीय नेत्यांचे स्वागत होतातच कसे? असा सवाल करून ठाकरे सरकारच्या विरोधात आज मनसे तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन होणार असल्याची माहिती आहे.

खरं तर देशात विशेष करून महाराष्ट्रात हिंदूंचे अनेक सण इथे मोठ्या उत्सवात साजरे होत असते पण कोविड चे कारण समोर करून इथल्या हिंदूना आपली संस्कृती व परंपरा जोपासण्यासाठी मज्जाव केल्या जात आहे. इथे राजकीय मेळावे होतात महाराष्ट्रात भाजप ची यात्रा निघू शकते. भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा होऊ शकते. पत्रकार परिषदेत व्यक्तिगत अंतर पाळल्या जात नाही, मास्क लावल्या जात नाही ते चालते तर मग हिंदूंच्या दहीहंडी व गणेश उत्सवावरच बंदी का? हे इथल्या आंधळ्या बहिऱ्या सरकारला कधी कळेल? आणि म्हणून आज हिंदूंच्या सण उत्सवावर लावलेली बंदी उठवावी म्हणून सरकारच्या विरोधात ढोल बजाओ आंदोलन करीत असल्याचे मत मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी प्रसारमाध्यमांना कळवले आहे.

ते पुढे म्हणाले की आम्ही महाराष्ट्राच्या संस्कृती परंपरेला अबाधित ठेऊन हिंदूंचे सर्व सण आणि उत्सव साजरे व्हावे यासाठी कार्य करतो आणि ही जबाबदारी येथील राज्यकर्त्याची सुद्धा आहे त्यामुळे आम्ह्चा आवाज सरकार पर्यंत पोहचवून हिंदूंचे सण साजरे करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी केली आहे. या आंदोलनात सर्व महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, मनकासे जिल्हाध्यक्ष रविष सिंग, महिला सेना जिल्हाध्यक्षा
सुनीताताई गायकवाड, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, महिला सेना जिल्हा उपाध्यक्षा शोभाताई वाघमारे,जिल्हा सचिव किशोरभाऊ मडगुलवार,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेंडे,तालुका अध्यक्ष विवेक धोटे. मनसे तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, शहर संघटक मनोज तांबेकर, पियुष धूपे इत्यादींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here