सामाजिक समता संघर्ष समिती तर्फे
घुटकाळा येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर:- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,भारतरत्न महामानव बोद्धीसत्व ,विश्ववरत्न,महाविद्धवान परमपूज्य डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त घुटकाळा वार्ड तुकडोजी महाराज चौक येथे सामाजिक समता संघर्ष समिती चंद्रपूर च्या वतीने शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम तुकडोजी महाराज चौक घुटकाळा वार्ड येथे आयोजित करण्यात येत आहे,
तरी गोरगरीब असलेल्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घ्यावा असे प्रामुख्याने समितीचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद इरफान शेख यांच्या वतीने आव्हान करण्यात येत आहेत,
कार्यक्रमाचे आयोजक वसंत दिकोंडवार,धीरज तांमगडे,सतीश दिकोंडवार, आशिष मंथनवार,कैलास पुराणकर,संदीप कागदेलवार,सलीम खान,आणि इम्रान खान इत्यादी कार्यकर्ते उपस्थित राहिल,