Home वरोरा दखलपात्र :- टेमुर्डा, मोवाडा ते आसाळा रस्त्यातील खड्डे अपघाताला देताहेत निमंत्रण.

दखलपात्र :- टेमुर्डा, मोवाडा ते आसाळा रस्त्यातील खड्डे अपघाताला देताहेत निमंत्रण.

सार्वजनिक बांधकाम विभाग साखर झोपेत, कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

वरोरा (धनराज बाटबरवे) :

वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची दुर्दशा हा नित्याचाच भाग असून येथील रस्ते बांधकाम करणारे कंत्राटदार हे काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते असल्याने कमिशनखोरित रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होतं आहे. त्यामुळे रस्ते बांधकाम झाले की लगेच दोन ते तीन महिन्यात रस्त्यांची पूर्णता वाट लागतं असते. असाच गंभीर प्रकार टेमुर्डा-मोवाडा ते आसाळा या रस्त्यांवर आढळून आला असून इथे पहिल्याच पावसात रस्ता ओरबाडून मोठं मोठे खड्डे झाल्याने वाहन चालवताना अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

टेमुर्डा मोवाडा ते आसाळा हा रस्ता हा मागील काही महिन्यांपूर्वी बनविण्यात आला होता मात्र कंत्राटदार यांच्याकडून राजकीय नेत्यांची कमिशनखोरी आणि अधिकाऱ्यांना दिले जाणारे टक्के यामुळे निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना याचा अपघाताच्या रूपाने मोठा फटका बसण्याची शक्यात निर्माण झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर त्वरीत उपाययोजना करून रस्त्यांची डागडुजी करावी व दोषी कंत्राटदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here