Home वरोरा गेमप्लॅन :- आज वरोरा येथे होणाऱ्या भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेतुन राजूरकर गायब ?

गेमप्लॅन :- आज वरोरा येथे होणाऱ्या भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेतुन राजूरकर गायब ?

केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत आलिशान लॉन मधे सायंकाळी कार्यक्रम.

वरोरा प्रतिनिधी :-

कुठल्याही राजकीय पक्षात प्राथमिक सदस्य नसताना किंव्हा त्यां पक्षात प्रवेश घेतल्याशिवाय महत्वाचे पद बहाल केल्या जातं नाही मात्र भाजप ने आपल्या लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी मागील वेळी मनसेच्या तिकिटावर विधानसभा लढलेले व 35 हजार मते घेतलेले रमेश राजूरकर यांना पक्ष प्रवेश घ्यायच्या अगोदरच वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे विधानसभा प्रमुख हे पद देऊन आपल्या गोटात त्यांना जमा केले, दरम्यान यांचा मुंबई येथे होणारा जाहीर पक्ष प्रवेश गुंडाळून चंद्रपूर जिल्ह्यात पक्ष प्रवेश घेण्याचे 25 जूनला निश्चित केले होते. मात्र आता रमेश राजूरकर यांच्याकडे रीतसर महत्वाचे विधानसभा प्रमुख म्हणून प्रमुख जबाबदारी असतांना त्यांच्याच विधानसभा क्षेत्रात आज दिनांक 24 जून ला होणाऱ्या भाजप च्या केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पत्रिकेत राजूरकर यांचे नावच गायब असल्याने त्यांचा भाजप मधे गेमप्लॅन तर झाला नसावा अशी शंका निर्माण होतं आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात भाजप मधे हंसराज अहिर व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार असे दोन गट अस्तित्वात आहे. त्यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला तिसरा गट आमदार बंटी भांगडीया यांच्या माध्यमातून तयार करून व नवख्या काही नेत्यांना जवळ करून विधानसभा निवडणुकीत खेळी करण्याचे धोरण आखल्याचे बोलल्या जातं आहे, असे असले तरी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विश्वासात घेतल्याशिवाय काहीही होणार नाही हे नुकतेच रमेश राजूरकर यांच्या मुंबई येथे पक्ष प्रवेश न झाल्याने अधोरेखित होतं आहे. पण आश्चर्य म्हणजे भाजप ने ज्या अर्थी राजूरकर यांना वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राची प्रमुख म्हणून जबाबदारी दिली असतांना त्यांचे नावच निमंत्रण पत्रिकेतुन गायब असणे म्हणजे रमेश राजूरकर यांचा गेम झाला कां ? असा प्रश्न उपस्थित होतं आहे.

भाजप पक्ष प्रवेशाच्या पूर्व संध्येला राजूरकर यांचा कां झाला गेम ?

एखाद्या राजकीय पक्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या नवख्या नेत्यांना जूने निष्ठावंत नेहमीच डावलन्याचा प्रयत्न करतात कारण त्यांनी पक्षाच्या उभारणीसाठी मोठी मेहनत घेतलेली असते.अगदी हिचं परिस्थिती राजूरकर यांच्या बाबतीत घडतं असून पक्ष प्रवेशाच्या पूर्व संध्येलाच रमेश राजूरकर यांना चक्क पक्षाच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेतुन डावललं असल्याने भविष्यात राजूरकर यांची अवस्था डॉ.अनिल बुजोने यांच्यासारखी होऊ शकते असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Previous articleडॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा त्याग विस्मरणात जाऊच शकत नाही
Next articleदखलपात्र :- टेमुर्डा, मोवाडा ते आसाळा रस्त्यातील खड्डे अपघाताला देताहेत निमंत्रण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here