Home वरोरा मनसे इम्पॅक्ट :- अखेर पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात

मनसे इम्पॅक्ट :- अखेर पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात

मनसेच्या पाठपुराव्याला मोठे यश, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील 14 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ,

 शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे 74 कोटी रुपये मिळविण्यासाठी पुन्हा पाठपुरावा.

वरोरा प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची कर्जमाफी व पीक विम्याच्या संदर्भात वेळोवेळी शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करून रस्ता रोको आंदोलन व ठिय्या आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले गेले होते, दरम्यान शासनाने वेळीवेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी व पीक विम्यासंदर्भात केलेल्या घोषणा व जाहीर केलेल्या तारखा ह्या खोट्या ठरल्या परंतु तरीही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे व पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात टाकले गेले पाहिजे हा आग्रह धरून मनसे कडून आंदोलन करून वेळोवेळी शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता,

अखेर शासनाने ओरिएंटल पीक विमा कंपनीकडे जवळपास 58 कोटी रुपये जमा केल्यानंतर आता पीक विमा कंपन्यानी शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात पैसे जमा कारण्यास सुरुवात केली आहे व हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा पोहचला आहे, त्यामुळे मनसेच्या आंदोलन व पाठपुराव्याला यश आले असल्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.

लढाई संपली नाही पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांनासाठी मनसे लढणार 

शेतकऱ्यांना आता 58 कोटी रुपयाचे पीक विमा पॅकेज मिळाले असले तरी शासनाकडे पुन्हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे 74 कोटी रुपये अजूनही बाकी आहे जे राज्य शासनाने ओरिएंटल पीक विमा कंपनीला दिले नाही, त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, मात्र यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उर्वरित पीक विम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे, प्रसंगी ग्राहक मंच्याकडे दाद मागून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळवून देण्याचे आश्वासन मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here