विरांगणा राणी झलकारी बाई बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा रंजना पारशिवे यांचा पुढाकार.
वरोरा :-
गेल्या दोन वर्षापासून विरांगणा राणी झलकारी बाई बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा रंजना पारशिवे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. महात्मे नेत्र यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया या शिबिराचे आयोजन करण्यात येते, या वर्षी सुद्धा साई मंगल कार्यालय वरोरा येथे येणाऱ्या 16 -10-2024 रोज बुधवारला नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे,
साई मंगल कार्यालयामध्ये नेत्र तपासणी झाल्यानंतर जे काही रुग्ण शस्त्रक्रियेचे निघतील त्या सर्व रुग्णांचे डॉ. महात्मे यांच्या नागपुर येथील खाजगी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया व राहण्याची व भोजनाची सर्व सुविधा उपलब्ध करून दुसरे दिवशी त्यांना परत वरोरा येथे सुखरूप परत सोडून देण्यात येणार आहे.
या सर्व प्रक्रियेमध्ये विरांगणा राणी झलकारी बाई बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा रंजना पारशिवे ह्या रुग्णांसोबत असणार आहे यात रुग्णांना कुठंलाही खर्च करावा लागणार नाही हे सर्व निशुल्क आहे. पहिल्या वर्षी 175 लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन झाले , दुसऱ्या वर्षी 322 लोकांचे ऑपरेशन झाले याही वर्षी या नेत्र रोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा गोरगरीब नेत्र रुग्णांनी घ्यावा असे आवाहन विरांगणा राणी झलकारी बाई बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा रंजना पारशिवे श्रीमती आशाबाई डोंगरे, सचिव, श्रीमती लिलाताई पचारे, सौ. सुानिता शिवरकर, सौ. पंचफुला पारशिवे, सौ. ज्योतीताई रेंगुडवार, श्रीमती कोमलताई गभणे, सौ. शिलाताई कोटनाके, सौ. बेबीताई किन्नाके, श्रीमती वंदनाताई बावणे, सौ. योगिता पचारे, सौ. गिताताई नवले, सौ. मंजुषा पारशिवे, सौ. मिनाताई वढे, सौ. अश्विनीताई पाटील, सौ. प्रियंका बडवाईक, रिंकु खोब्रागडे, सौ. दुर्गाताई ढागे (वरोरा) सौ. माधुरी गेडाम, अनिता बुरडकर, भद्रावती, शालिनी दाते, करिष्मा गैघाटे (वनोजा), सविता काळे, कुसुम दाते (करंजी), निळाबाई काळे ताराबाई आसुटकर (बोर्डा) सौ. रंजना वाभिटकर, सुवर्णा झाडे (दहेगाव), श्रीमती उषा लांबट, बेबीताई उमरे (नंदोरी), कुंताताई ठक, सौ. ममताताई मेश्राम, सौ. प्राची दाते, ममताई दांडेकर, सौ. सुशिला दर्वेकर, सौ. लताताई किन्नाके, सौ. छायाताई डांगे, कुंदाताई करलुके, सौ. ललिताताई झाडे, सौ. सुनंदाताई मुळे, सौ. अर्चनाताई नन्नावरे, सौ. अल्काताई आबांडे, सौ. विद्याताई गोरघाटे, सौ. शुभांगी मोडक. कु सपना बर्वे, सौ. सुमित्राताई वांढरे, सौ. उषाताई गंधारे, सौ. निलीताई यंन्ने, सौ. ताराबाई मत्ते यांनी केले आहे.