Home भद्रावती भद्रावती तालुक्यातील चिरादेवी जवळील झुडपी जंगल साफ करून बेकायदेशीर अतिक्रमण.

भद्रावती तालुक्यातील चिरादेवी जवळील झुडपी जंगल साफ करून बेकायदेशीर अतिक्रमण.

वनविभागात व महसूल विभागात ते झुडपी जंगल कुणाचे या वादात स्थानिकांचे मोठे अतिक्रमण कोण काढणार ?

भद्रावती प्रतिनिधी :-

भद्रावती तालुक्यात महसूल विभागाचे केवळ रेती उत्खनन व गौण खनिज उत्खनन यावर देखरेख करून माल सूतो अभियान राबवले जातं असल्याने महसूल विभागाच्या जागा कुणी हडपल्या यांचे त्यांना काहीएक सोयरसुतक नाही.दरम्यान चिरादेवी गावा लगतअसलेल्या झुडपी जंगल तोडून त्यां जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण होतं असल्याचा गंभीर प्रकार एका सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणला असता वन विभागाच्या चमूने प्रत्यक्ष मौका चौकशी केली पण ही जागा महसूल विभागाची असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकाशावरील नमूद एन्ट्री वरून सांगितल्या नंतर महसूल विभागाने यावर प्रत्यक्ष मौका चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होतं आहे.दरम्यान अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीचा सातबारा यांची तपासणी व्हावी जेणेकरून त्यांच्या मूळ जमिनी किती आहेत हे दिसून येईल.

झाडे जगवून वन पर्यावरण संरक्षण करण्याची जबाबदारी ही शासकीय अधिकाऱ्यांची आहे मात्र झुडपी जंगल नष्ट करून दुर्मिळ पशुपक्षी यांची जीवित हानी करीत असल्याचा गंभीर प्रकार या ठिकाणी सुरू असतांना प्रशासन गप्प कां विषय गंभीर आहे. जमीन महसूल व वने झुडपी जंगल, सामाजिक वनीकरण कुठल्याही क्षेत्रातील असो. तेथील झाडे नष्ट करीत संबंधित शासनाच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा अधिकार कुणालाच नाही. मग कुणाच्या परवानगीने व आदेशाने संबंधित जागेवर अतिक्रमण करण्याचा सपाटा अतिक्रमणधारकांनी चालवला याचा शोध घेणे गरजेचे आहे

20 ते 40 एकर अतिक्रमित महसूल व वन विभाग कुंभकर्णी झोपेत,

भद्रावती मधील चिरादेवी व वडाळा रिठ मधील झुडपी जंगल वने विविध जातीची झाडे उध्वस्त करीत मोठ्या प्रमाणात वाढते अतिक्रमण याकडे संबंधित प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होतं असल्याचा  गंभीर प्रकार सुरू असून जवळपास 20 ते 40 एकर झुडपी जंगल नष्ट करून तिथे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होतं असल्याने या बाबीची तातडीने दखल घेऊन मौका चौकशी होणे गरजेचे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here