Home चंद्रपूर धक्कादायक :- भाजपच्या माजी नगरसेवकाची मनपा पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्याला मारहाण.

धक्कादायक :- भाजपच्या माजी नगरसेवकाची मनपा पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्याला मारहाण.

मारहाण करणाऱ्या त्या माजी नगरसेवक विरोधात पोलिसात तक्रार का दाखल केली नाही ? मनपा प्रशासन गप्प का ? 

चंद्रपूर:-
सत्तेचा माज असलेल्या लोकप्रतिनिधीनी जणू कायदा हातात घेऊन देशात आणि राज्यात दडपशाही राबवली की काय असाच प्रश्न पडतो. मात्र शांतताप्रिय असलेल्या चंद्रपूर शहरात भाजपचा माजी नगरसेवक जो गुंड प्रव्रुत्तिचा आहे त्यांच्याकडून शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्याला मारहाण होते, मात्र यावर मनपा प्रशासन गप्प राहते. त्या गुंड प्रव्रुत्तिच्या नगरसेवका विरोधात पोलिसात तक्रार दाखल करत नाही तर मग पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी अधिकारी व कर्मचारी, कामगार यांची सुरक्षा कोण करणार? हा प्रश्न उभा ठाकला आहे. अगोदरच पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचारी कामगार यांना कुठला ठेकेदार वेतन देतो हे अजूनही कळले नाही त्यातच आता त्यांच्यावर हल्ले व्हायला लागले असल्याने हे मनपा प्रशासन कुणाच्या इशाऱ्यावर चालतंय हेच कळतं नाही.

महानगर पालिका पाणीपुरवठा विभाग नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणास्त चर्चेत असतात कारण पाणी पुरवठा झाला नाही की राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधी यांच्या रडारवर असतो तो केवळ पाणी पुरवठा करणारा कर्मचारी व कामगार पण त्यांना त्यामागचं कारण समजून घ्यायला सुद्धा वेळ नसते असाच एक किस्सा शहरात घडला असुन दिनांक,06,09,2023 ला पाणीपुरवठा शहरात झाला नाही त्यांचे कारण इरई नदीतील पंप नादुरुस्त होते व त्यांचे मेंटनन्स सुरू होते पण भाजप चे माजी नगरसेवक ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे त्यांनी आपल्या नेत्यांचा आव आणत पाणी पुरवठा विभागात काम करणाऱ्या सुपरवायझर ला पाणी का सोडले नाही म्हणून कानशिलात लगावली व मारहाण केली. खरं तर पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही याचा अर्थ या विभागातील कर्मचारी अधिकारी काम करत नाही असा त्याचा अर्थ होत नाही कारण तांत्रिक कारणाने कधी कधी पाणी पुरवठा होत नाही पण कायदा हातात घेऊन ज्या प्रकारे भाजप च्या माजी नगरसेवक याने पाणी पुरवठा करणाऱ्या सुपरवायझर ला मारहाण केली त्याबाबत मनपा प्रशासनाने त्या नगरसेवका विरोधात तक्रार दाखल करायला हवी पण मनपा प्रशासन कशाला घाबरत आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे.

मनपा प्रशासनाने एक नाममात्र ठेकेदार ठेऊन शहरातील पाणी पुरवठा कंत्राट त्यांना फक्त कागदोपत्री दिले खरे पण कारभार मात्र मनपातील काही अधिकारीच पाहतात व कंत्राटी कर्मचारी कामगार यांचे आर्थिक शोषण होत आहे. त्याकडे कुणाचे लक्ष नाही. ठेकेदारी पद्धतीने ठेवण्यात आलेले कामगार कर्मचारी यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळतं नाही. शासनाने कामगार कायद्यांतर्गत ठरवून दिलेल्या कुठल्याही सोयीसुविधा मिळतं नाही, रात्री बेरात्री पाणी पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून कंत्राटी कामगार कर्मचारी यांना तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी जागे राहावे लागतंय ते कुणी बघायला तयार नाही पण शेवटी मार खावा लागत असेल तर मग मनपा अधिकारी नेमके कुठल्या जगात वावरत आहे ? का त्यांना आपल्यां कर्मचारी कामगार यांची जाणीव नाही ? असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत असतांना त्या बिचाऱ्या पाणी पुरवठा करणाऱ्या कामगार कर्मचारी यांना मारहाण होतांना काय वाटतं असेल ? यांची जाणीव मनपातील अधिकाऱ्यांना निश्चितपणे व्हावया हवी व त्या गुंड प्रव्रुत्तिच्या भाजप माजी नगरसेवक याला धडा शिकवायला हवा नाहीतर असेच गावगुंड मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मारहाण करतील हे निश्चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here