Home गडचिरोली महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे योगदान अविस्मरणीय – डॉ. नामदेव...

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे योगदान अविस्मरणीय – डॉ. नामदेव किरसान.

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे योगदान अविस्मरणीय – डॉ. नामदेव किरसान.

 

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर

गडचिरोली .०९/०१/२०२४ रोजी मौजा दिभना (माल) ता. जि. गडचिरोली येथे माळी समाज संघटना, दिभना (माल) यांच्या वतीने *”क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती महोत्सव व आई सावित्रीमाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुर्णाकृती स्मारकाचे लोकार्पण सोहळा”* या कार्यक्रमाच्यां उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी घडवून आणलेली सामाजिक क्रांती अविस्मरणीय असून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार हा स्त्री पुरुष समानतेचा प्रतीक असल्याचे सांगून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी धर्ममार्तंडांचा विरोध झुगारून लावून पुण्याला भिडे वाड्यात पहिली स्त्रियांची शाळा सुरू केली. स्त्रियांना शिक्षित सुशिक्षित करणं हे धर्मविरोधी असून ते पाप असल्याचे सनातनी धर्म मार्तंडांनी ठरविल्यावर व त्यांच्यावर शेणाचा चिखलाचा व घाणीचा मारा करून त्यांना अनन्यप्रकारे त्रास दिल्यावर सुद्धा त्यांनी स्त्री शिक्षणाचे व्रत सोडले नाही. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजात समतेचे बीज रोवण्याचे काम केले. सर्वांना समान संधी, समान न्याय व समान वागणूक मिळवून देण्यासाठी अत्यंत टोकाची विषमता असलेल्या समाजात समता रुजविण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. शेतकऱ्यांची व्यथा समजून घेण्यासाठी “शेतकऱ्याचे आसूड” हा ग्रंथ लिहिला. तसेच समाजात रुजविण्यात आलेली असमानता व भेदभाव दृष्टींगत करण्यासाठी व तो झुगारून लावण्यासाठी “गुलामगिरी” हा ग्रंथ लिहिला. करिता फुले दांपत्यांचे समाजासाठी केलेले योगदान हे अत्यंत मोलाचे असून ते अतुलनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
दिभना माल येथे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे लोकार्पण शिवसेना सहसंपर्कप्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांच्या हस्ते व अनावरण कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर नामदेव किरसान, प्रमुख अतिथी भाजप जिल्हा सचिव विलासजी देशमुखे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, माळी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, प्रमुख मार्गदर्शक प्रा. संजय मगर यांचे हस्ते पार पडले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ता उत्तमजी ठाकरे, सामाजिक कार्यकर्ता देवप्रेम लोणबले, योगेश सोनुले, सरपंच दिभना सुरेश गुरनुले, सौ. संगीताताई मांदाळे, वनरक्षक सिडाम मॅडम, देवानंद चलाख, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here