Home चंद्रपूर सैनिक शाळेत होणार जिल्हास्तरीय नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाचा क्रीडा व सांस्कृतीक महोत्सव

सैनिक शाळेत होणार जिल्हास्तरीय नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाचा क्रीडा व सांस्कृतीक महोत्सव

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर मनपा व १७ नगरपरिषद व नगर पंचायतच्या ५०० हुन अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग

चंद्रपूर  :-  १७ जानेवारी – महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाअंतर्गत जिल्हास्तरीय नागरी स्थानिक स्वराज्य संस्थासाठी क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन दि.१९ ते २१ जानेवारी दरम्यान सैनिकी शाळा विसापूर येथे करण्यात आले आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नगर परीषद व महानगरपालिका यांचा सहभाग असणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांप्रमाणे नगर विकास विभाग अंतर्गत येत असलेले कर्मचारी नागरीकांना सोयी सुविधा पुरविण्यास कठीण परिश्रम करतात. कार्यालयीन कामांमुळे अनेकदा स्वतःच्या मानसिक व शारीरिक स्वाथ्याकडे दुर्लक्ष होते. कर्मचाऱ्यांना नियमित कामातून थोडा‎ दिलासा मिळावा, संघटित भावना व खेळ भावना वाढीस लागावी या उद्देशाने‎ सदर कला व क्रीडा‎ महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यात मैदानी‎ स्पर्धांमध्ये सांघिक प्रकारात फुटबॉल,व्हाॅलिबाॅल, क्रिकेट,टग ऑफ वॉर,‎४०० मीटर रिले रेस वैयक्तिक खेळात १०० मीटर रनिंग या साेबत‎ इनडोअर गेम चेस,कॅरम, बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात येणार आहेत.‎

नगर विकास विभागाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अश्या महोत्सवाचे आयोजन प्रथमतःच होत असुन यात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, वरोरा, भद्रावती, चिमुर, घुग्गुस, ब्रम्हपुरी,जिवती, सिंदेवाही,गडचांदूर, सावली,कोरपना, नागभीड,पोंभुर्णा,गोंडपिंपरी,मुल, भिसी, बल्लारपूर मिळुन १७ नगरपरिषद,नगरपंचायत व चंद्रपूर महानगरपालिका सहभागी होणार आहे. सर्व क्रीडा स्पर्धा या दिवसा तर सांस्कृतीक स्पर्धा संध्याकाळी घेण्यात येणार आहे. सर्व नगर परिषद कार्यालयांच्या सहभागातुन स्पर्धा होणार असुन नगर परिषद भद्रावती कार्यान्वीत यंत्रणा म्हणुन काम बघणार आहे. स्पर्धकांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था चंद्रपूर येथे करण्यात आली आहे.

स्पर्धेच्या नियोजनाकरीता मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली व नगर परिषद भद्रावती येथील मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात नियोजन समिती, स्वागत समारोह व समारोप समिती,माहीती व प्रसिद्धी समिती,वैद्यकीय समिती,तक्रार निवारण समिती,क्रीडा समिती,सांस्कृतीक समिती, भोजन व निवास व्यवस्था,बक्षीस वितरण समिती,खरेदी व खर्च व्यवस्थापन समिती अश्या विविध समितींचे गठन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here