Home Breaking News मालमत्ता धारकांना शास्तीत सवलत सुटीच्या दिवशीही भरता येणार कर

मालमत्ता धारकांना शास्तीत सवलत सुटीच्या दिवशीही भरता येणार कर

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

३१ जानेवारी २०२४ पर्यंत ५० टक्के सूट ०१ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत २५ टक्के सवलत

चंद्रपूर  :-  24 जानेवारी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करणाऱ्याना शास्तीत सवलत देण्यात येत असुन ३१ जानेवारी २०२४ पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकास शास्तीत ५० टक्के सूट तर ०१ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकास शास्तीत २५ टक्के सवलत देण्यात येत आहे.तसेच कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने सुटीच्या दिवशी भरणा करता येणार आहे.

महापालिका क्षेत्रात ८० हजाराहुन अधिक मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करण्यात येते. कर न भरल्यास दंड वसुली तसेच प्रसंगी मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेचे स्वतःचे उत्पन्न वाढुन कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर किरकोळ खर्च पालिकेला स्वतःच्या उत्पन्नातून भागविण्याचे दृष्टीने मालमत्ता कराची वसुली नियमित व प्रभावी होण्याकरीता शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये सुधारणा करून विहित कालावधीनंतर शास्ती लागु करण्याची तरतूद केलेली आहे. अश्या प्रकारे लागु होणाऱ्या शास्तीमध्ये पुर्णतः किंवा अंशतः सूट देण्याचे अधिकारी महानगरपालीकेस आहेत.

यापुर्वी सप्टेंबर २०२३ पर्यंत १० टक्के व डिसेंबर २०२३ पर्यंत चालु मालमत्ता करात ५ टक्के सूट मनपातर्फे देण्यात आली होती. मात्र कर भरणा करणाऱ्यांच्या संख्येत आवश्यक ती वाढ दिसुन आली नाही. त्यामुळे मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीकरीता व संभाव्य उद्दिष्ट पूर्ती करीता मनपातर्फे शास्तीत सवलत जाहीर करण्यात आली आहे. या शास्ती माफीचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here