कंत्राटी ठेकेदाराची कचरा उचलण्यात मनमानी
अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- वडगाव प्रभागातील सध्या मोठया नाला पासून तर छोट्या नाल्या ची साफसफाई सुरू आहे, कारण काही दिवसांपूर्वी वडगाव प्रभागातील माजी नगराध्यक्षा सौ, सुनीता लोढीया यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले होते, या निवेदनाची दखल घेत वडगाव प्रभागात नाले साफसफाई चे काम तर जोरात सुरू आहे,
मात्र यातील जो घाण कचरा निगत आहे,तो मात्र उचलण्यात दीर्घाई दिसून येत आहे कारण नागपूर रोड सलीम पेंटिंग जवळील नाल्याचे साफसफाई काम गेल्या चार ते पाच दिवसापासून चालू आहे, व या नाल्याचे जे गंदगी आणि वास असलेले घाण कचरा निगत आहे तो गेल्या चार-पाच दिवसापासून मुख्य रोडवर टाकण्यात येत आहे, व इतकेच नाही तर त्या रोडावरून समोरील वाड्यातील नागरिकांचा रहदारीच्या रस्ता आहे व सोबतच तिथे व्याफल या नावाचे मोठे फूट चे दुकान सुद्धा आहे,
व इथे लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत सर्व नागरिक खाद्यपदार्थ खाण्यासाठी येतात आणि अशा मुख्य ठिकाणी या नाल्याचे गंधगी चे घाण कचरा ठेवण्यात आलेला आहे, इतका रहदारीचा रस्ता व त्यात खाद्यपदार्थाचे दुकान असतानाही सुद्धा येतील मनपा प्रशासन व कंत्राटी ठेकेदार हा कचरा गेल्या चार – पाच दिवसापासून उचलण्यान दीर्घाई का? दाखवत आहे असा प्रश्न सध्या येथील नागरिकांना पडलेला आहे,
व नागरिकांनी जेव्हा मनपा अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की हे काम आमचे नसून कंत्राटी ठेकेदार या कचऱ्याला उचलतात व ते तानाशाही करत असल्याचे सांगण्यात आले,व ठेकेदाराच्या माणसाला विचारले असतात तो मनमानी उत्तर देत आहे, म्हणजे नालेसफाई तर होत आहे
पण कचरा उचलण्यात मनमानी दिसत आहे, पण या कचऱ्यामुळे वाड्यातील आणि या फुड्स दुकानासमोरील जे नागरिक येतात त्यांना मात्र या घाण कचऱ्यामुळे डास व समोर येणाऱ्या र्बिमारीला तोड दयावे लागनार आहे, हे मात्र नकी आता या घाण कचऱ्याला सध्या कंत्राटी ठेकेदार केव्हा आणि पुन्हा कीती दिवसांनी विलेवाट लावेल याचे लक्ष येथील नागरिकांना लागले आहे,