Home Breaking News छोटुभाई पटेल हायस्कूल मध्ये “शाळेचा पहिला दिवस ..गोड दिवस “

छोटुभाई पटेल हायस्कूल मध्ये “शाळेचा पहिला दिवस ..गोड दिवस “

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

माजी विद्यार्थी (१९९९) तर्फे अभिनव उपक्रम

चंद्रपूर   :-  छोटुभाई पटेल हायस्कूल येथील माजी विद्यार्थी १९९९ तर्फे छोटुभाई पटेल हायस्कूल मध्ये “शाळेचा पहिला दिवस ..गोड दिवस” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला..शाळेचा पहील्या दिवशीच्या आठवणी प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोरलेल्या असतात. विद्यार्थी दशेत असतांना शाळेचा पहिला दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो.

या दिवसाचे औचित्त्य साधुन शाळेत जगलेल्या पहिल्या दिवसाच्या आठवणींना परत उजाळा म्हणून माजी विद्यार्थ्यांतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला..अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला ..या कार्यक्रमा अंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच गोडधोड वाटून पहिल्या दिवसाचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.

शाळेचे संचालक मा. श्री जीतेन (लोटी) पटेल यांचे मार्गदर्शन शाळेतील सर्व शिक्षक. शिक्षिका यांचे उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाची संकल्पना श्री धिरज साळुंके यांनी मांडली तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अश्विन मुसळे,, प्रफुल्ल देमेवार , जितेन्द्र मशारकर, अभिषेक आचार्य , चंद्रकांत कोतपल्लीवार , अमोल डोमाडे ,शिल्पा चहारे , गणेश रामगुंडेवार , विना खोब्रागडे, श्याम कोंतमवार, सागर कुंदोजवार, अजय फूलझेले, कृणाल पद्मगिरीवार , पराग जवळे , यांनी कठोर मेहनत घेतली तर १९९९ मधिल माजी विद्यार्थ्यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here