Home चिंत्याजनक

वेगावात एका व्यत्कीने गळफास लावून आत्महत्या

मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील आज दि. 8 जुलै रोज  सोमवार रोजी  सायंकाळी अंदाजे सहा वाजताच्या  दरम्यान एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
संतिश दिलीप मेश्राम (२९, वेगाव) असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सतिश हे भूमिहीन असून मोलमजुरीचे काम करत होता.
 आज सोमवार दि‌ ८जुलै रोजी सुर यांच्या शेतामध्ये पडीत जागेमध्ये असलेल्या पळसाच्या झाडाला सतिश यांनी नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
    या घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले व या घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे. मृतकाच्या पश्चात,आई,पत्नी, दोन मुली असा आप्ते परिवार पाठीमागे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here