Home गडचिरोली नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी मा.खा.अशोक नेते मुख्यमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्र्यांचे दुरध्वनीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश.

नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी मा.खा.अशोक नेते मुख्यमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्र्यांचे दुरध्वनीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश.

नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी मा.खा.अशोक नेते मुख्यमंत्र्यांना भेटले

मुख्यमंत्र्यांचे दुरध्वनीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश.

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर

गडचिरोली : सततच्या मुसळधार पावसाने आणि नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे, तसेच गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व द‌रवाजे उघडून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गडचिरोली-चिमूर क्षेत्रातील अनेक नदी नाल्यांना मह‌ापूर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. याचबरोबर अन्न धान्याच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी माजी खासदार अशोक नेते यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी संजय दैने यांना फोन करून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

भाजपच्या बैठकीसाठी नेते मुंबईत असल्याने सुद्धा लोकसभा क्षेत्रातील नागरिक वासिय जनतेची त्यांनी नुकसानग्रस्तांना लवकर मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सततच्या पावसामुळे अनेक घरांची पडझडसुद्धा झाली आहे. पूर आल्याने काही शेतकऱ्यांची ज‌नावरे पाण्यात वाहुन गेली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासह लोकसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे अशोक नेते यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने याची दखल घेतली आहे. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडामसुद्धा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here