Home चंद्रपूर संतापजनक :- सीएसटीपीएस मधील अधिकऱ्यांच्या विनंती बदल्या रखडल्या असताना प्रतिनियुक्त्या का?

संतापजनक :- सीएसटीपीएस मधील अधिकऱ्यांच्या विनंती बदल्या रखडल्या असताना प्रतिनियुक्त्या का?

प्रतिनियुक्यासाठी रक्कम घेणारे ते कोण सक्षम अधिकारी? व प्रतिनियुक्ती मिळविणारे ते कोण ?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्रातील अधिकारी यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होतो याबद्दल अनेकदा वर्तमानपत्रात बातम्या झळंकत असतात पण त्याच त्या ठिकाणी बदली झाल्यानंतर सुद्धा प्रतिनियुक्ती मिळावी म्हणून वरिष्ठाना लाखों रुपयाची ओवाळणी देणारे अधिकारी यांची पोल खुलली असतांना आता त्यांनी ज्यांच्या मार्फत ही ओवाळणी दिली त्यांनी वरिष्ठाना ती ओवाळणी पोहचवली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याची चर्चा आहे. दरम्यान ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी विनंती अर्ज करून बदली करिता वरिष्ठाकडे मागणी केली त्यांच्या अर्जाला कराची टोपली दाखवत पैसे घेऊन प्रतिनियुक्ती करण्याचा जो प्रकार उघडकीस आला तो संतापजनक असल्याचे स्पष्ट होत आहे.

या सरकारी कंपनीत नेहमीच कोळसा पुरवठा घोटाळा, कोळसा चोरी घोटाळा, भंगार चोरी घोटाळा, कधी पाईप चोरी घोटाळा, कधी बोगस कर्मचारी भरती घोटाळा तर कधी अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या संदर्भातील आणि पदोन्नती घोटाळा होत असतो आणि दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा हवाला कांड झाल्यानंतर त्यावर पांघरून घातल्या जाते, त्याचा परिणाम वीज निर्मितीमध्ये होऊन वीज उत्पादन खर्च वाढला जातो पर्यायाने सरकारला विजेचे दर वाढविण्याची गरज भासते आणि त्याचा सर्वसामान्य वीज ग्राहकांवर मोठा आर्थिक बोझा पडतो, मात्र खालून वरपर्यंत सेटिंगबाज अधिकारी तेच ते कंत्राटदार आणि तेच ते अधिकारी यांच्या माध्यमातून कोट्यावधीचा भ्रष्टाचार होत आहे आणि त्यावर कुणीही अंकुश ठेवणारे दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे सीएसटीपीएस मधील अधिकारी यांचा हा खेळ सतत सुरु असून प्रतिनियुक्ती सारख्या अतिशय गंभीर बाबीवर प्रकाशगढ मधील संचालक लक्ष देईल का? व सीएसटीपीएस मधील भ्रष्टाचारावर आळा बसवेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ते कोण आहेत प्रतिनियुक्ती मिळविणारे व सक्षम अधिकारी ?

सीएसटीपीएस मधील स्थापत्ये अभियंते यांची महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित कर्मचारी सेवाविनियमातील सोळाव्या अनुसूचीद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांस अनुसरुन सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या मंजुरीनुसार स्थापत्य अभियंते यांची स्तंभ क्रमांक ४ मध्ये दर्शविलेल्या ठिकाणी समपदावर प्रतिनियुक्तीच्या कालावधीमध्ये ६ महिन्यांची मुदतवाढ (दिनांक. ०३.०२.२०२५ पर्यंत) देण्यात येत आहे असल्याचे म्हटल्या गेले आहे, यामध्ये श्रीमती प्राजक्ता पुंडलिकराव स्वामी, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) स्थापत्य-२, कोराडीमधून म.ओ. वि. केंद्र, चंद्रपुर येथे प्रतिनियुक्ती, अश्विनी गोपाळराव नंदेश्वर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य) स्थापत्य-२, कोराडी मधून म.ओ.वि. केंद्र, चंद्रपुर येथे प्रतियुक्ती ऋषीकेश सुभाषराव पुंडकर, उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य) म.ओ.वि. केंद्र, चंद्रपुर स्थापत्य बांधकाम मंडल, पारस येथे तर स्वप्निल शेषराव ठाकरे, सहाय्यक अभियंता (स्थापत्य) स्थापत्य बांधकाम मंडल, चंद्रपुर म.औ.वि. केंद्र, चंद्रपुर येथे प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. दरम्यान या स्थापत्ये अभियंते मागील जवळपास 2007 पासून एकाच विभागात असतांना यांना अशी कुठली इमरजन्सी होती किंव्हा त्यांची त्याच पदावर सहा महिने प्रतिनियुक्ती देण्याची गरज भासली याचे कारण उलगडले नाही, शिवाय सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या मंजुरीनुसार यांची प्रतिनियुक्ती झाली तर ते सक्षम अधिकारी कोण याचा पण उलगडा व्हायला हवा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here