Home चंद्रपूर श्री नवयुक बाल गणेश मंडळ, दत्त नगर,चंद्रपूरः जुने नाणे आणि किल्ला प्रदर्शनी...

श्री नवयुक बाल गणेश मंडळ, दत्त नगर,चंद्रपूरः जुने नाणे आणि किल्ला प्रदर्शनी स्पर्धा संपन्न

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

मंडळाच्या दहा वर्षांच्या जयंतीसाठी आयोजित प्रदर्शनी स्पर्धा

चंद्रपूर  :-  श्री नवयुक बाल गणेश मंडळ, दत्त नगर, नागपूर रोड, चंद्रपूरने यावर्षी जुने नाणे आणि किल्ला प्रदर्शनीची भव्य स्पर्धा आयोजित केले. मंडळाच्या दहा वर्षांच्या जयंतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महिलांनी, मुलांनी आणि मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

काय आहे या मंडळाची वैशिष्ट्ये

चंद्रपूरमध्ये दरवर्षी महानगरपालिकाच्या वतीने पर्यावरण पूरक गणेश मंडळ स्पर्धा आयोजित केली जाते व या स्पर्धेमध्ये मागील चार वर्षापासून श्री नवयुक बाल गणेश मंडळ दत्त नगर प्रथम क्रमांक प्राप्त करून पर्यावरण पूरक देखावे सादर करणारे गणेश मंडळ म्हणून चंद्रपूर मध्ये नावलौकिक प्राप्त केले आहे. आणि आता या मंडळाला दहा वर्षे पूर्ण झाली.

News reporter :- अतुल दिघाडे

स्पर्धेत विविध किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली, ज्यामध्ये सिंधुदुर्ग, सिंहगड, प्रतापगड आणि जंजिरा यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश होता. सहभागींच्या किल्ल्यांच्या निर्मितीने दर्शविलेली तपशिल आणि माहिती उपस्थितांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

सोबत जुने नाणे प्रदर्शनीमध्ये 17 व्या शतकापासून अठराव्या शतकातील विविध नाणे प्रदर्शित करण्यात आली. अर्धा पैसा, एक पैसा, पाच पैसे, दहा पैसे यासारख्या भारतीय नाण्यांबरोबरच विदेशी नाण्यांचा देखील समावेश होता. प्रदर्शनीने अनेक नागरिकांना जुनी नाणी आणि त्यांची ऐतिहासिक मूल्ये जाणून घेण्याची संधी दिली.

ही प्रदर्शनी आणि स्पर्धा मंडळाच्या पर्यावरण पूरक गणेश मंडळ स्पर्धेसह चंद्रपूरमध्ये एक महत्त्वाची घटना ठरली, ज्याने समाजातील विविध वर्गांचे लक्ष वेधले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here