Home चंद्रपूर 51 फूट उंच महाकाली महोत्सवाच्या ध्वजाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

51 फूट उंच महाकाली महोत्सवाच्या ध्वजाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

51 फूट उंच महाकाली महोत्सवाच्या ध्वजाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

राजेंद्र मेश्राम 

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर:-श्री माता महाकाली महोत्सवानिमित्त महाकाली मंदिरासमोर 51 फूट उंच असलेल्या महाकाली महोत्सवाच्या ध्वजाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री माता महाकाली ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
श्री माता महाकाली महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात सुंदर रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण परिसर सजविण्यात आला आहे. नुकतेच राज्यपालांच्या हस्ते राजस्थान येथे तयार करण्यात आलेल्या माता महाकाली महोत्सवाच्या रथाचे विधिवत पूजन महामहिम सि. पी. राधाकृष्णन यांनी केले. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात स्थानिक कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. तसेच महाकाली महोत्सवावर आधारित चित्रकला स्पर्धेचेही आयोजन या महोत्सवात करण्यात आले आहे.
दरम्यान, महाकाली मंदिरासमोर 51 फूट उंच ध्वज तयार करण्यात आला आहे. दरवर्षी चैत्र महिन्यात भरणाऱ्या यात्रेत व महाकाली महोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी येथे ध्वजारोहण केले जाते. यंदाही श्री माता महाकाली महोत्सव समितीची संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी, याचे विधिवत पूजन पार पडले. यावेळी माता भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महाकाली महोत्सवाची चर्चा राज्यभरात होत असून आपल्या सर्वांच्या सहकार्याने यंदाचे महोत्सवही अभूतपूर्व होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here