धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता, 23 नोव्हेंबर ला कुणाचा गुलाल उधळणार याची जोरदार चर्चा ?
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानातून कोण कोण आमदार निवडून येतील याबद्दल सट्टा बाजारात गरमगाराम चर्चा असून सट्टा बाजारातील भाव ठरले आहे,
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात किशोर जोरगेवार (भाजप) यांना 85 पैसे तर प्रवीण पडवेकर (काँग्रेस) – 1₹15 पैसे भाव आहे यावरूनसट्टा बाजारात किशोर जोरगेवार यांना आमदार होण्याची पुन्हा संधी मिळणार असल्याचे दिसत आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रात काट्याची टक्कर असून सुभाष धोटे (काँग्रेस) यांना 95 पैसे तर वामनराव चटप (शेतकरी संघटना) यांना 95 पैसे आणि देवराव भोंगळे (भाजप) यांना 3 रुपयेअसा भाव आहे त्यामुळे या विधानसभा क्षेत्रात सुभाष धोटे किंव्हा वामनराव चटप यापैकी कोणीही निवडून येऊ शकतात.
वरोरा विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार करण देवतळे यांना 30 पैसे तर अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोडे यांना 2 ₹30 पैसे तर कांग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांना 5 रुपये असा भाव आहे, यावरून करण देवतळे हे या विधानसभा क्षेत्रात निवडून येतील असा सट्टा बाजार सांगत आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्रात काट्याची टक्कर आहे, कारण इथे जवळपास 82 टक्के मतदान झाले आहे, यात कांग्रेस उमेदवार सतीश वारजुरकर यांना 90 पैसे तर भाजप चे बंटी भांगडिया यांना 97 पैसे भाव आहे यावरून सतीश वारजुरकर हे निवडून येईल अशी सट्टा बाजारात चर्चा आहे.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना अपक्ष उमेदवार डॉ अभिलाषा गावतूरे यांनी घाम फोडला होता पण सट्टा बाजारात भाजप उमेदवार मुंगनटीवार यांना 65 पैसे, अभिलाषा गावतुरे (अपक्ष) – 1₹ 90 पैसे तर संतोष रावत (काँग्रेस)- 1₹ 95 पैसे आहे यावरून सुधीर मुंगनटीवार हे निवडून येतील.
ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सगळे विरोधक व पक्षातील काही विरोधक एकत्र येऊन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटिवार यांना हरविण्याचा प्रयत्न झाला मात्र तरीही विजय वडेट्टीवार यांना सट्टा बाजारात – 20 पैसे भाव दिला आहे तर त्यांचे विरोधात कृष्णलाल सहारे यांना -5 रुपये भाव मिळाल्याने विजय वडेट्टीवार हे निवडून येईल असा सट्टा बाजार आहे.