तहसीलदार भद्रावती आता रेती चोरट्यावर काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लागले लक्ष.
भद्रावती (जावेद शेख):-
जिल्ह्यात रेती घाट लिलाव झाले नसल्याने चोरट्या मार्गाने रेती चोरी करून ती बाजारात विकणारी टोळी सर्वत्र दिसत असतांना महसूल प्रशासनाने जप्त केलेली रेती सुद्धा आता रेती माफिया चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार भद्रावती तालुक्यात नुकताच उघडकीस आला आहे, भद्रावती तालुक्यातील जॉबाज तलाठी राखी टिपले यांनी धाडसी कार्यवाही करत रेती माफीयांनी अवैध रेती साठा भद्रावती तालुक्यातील कोकेवाड़ा ते काटवल तुकून या दोन गावच्या मधोमध सरकारी जागेवर ठेवला असल्याची माहिती मिळताच तो रेतीसाठा त्यांनी जप्त केला आणि सदर माहिती तहसील प्रशासनाला दिली, मात्र जप्त केलेला साठा रात्रीतूनच रेती माफीयांनी उचलून नेल्याने रेती माफियाचे हौसले किती बुलंद आहे याची प्रचिती येत असून महसूल विभागाच्या आशीर्वादाशिवाय एवढे धाडस रेती माफिया करू शकत नाही त्यामुळे आता तहसीलदार काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खरं तर या प्रकारामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी महसूल विभागाकडून पोलिस पोलिसात तक्रार देऊन या प्रकरणी दोषीवर त्यांचे ट्रक ट्रॅक्टर जप्तीची कार्यवाही करावी व त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे व त्यांच्यावर या अगोदर गुन्हे दाखल असेल तर त्यांच्यावर तडीपार ची कार्यवाही करावी जेणेकरून कुणी जप्त केलेला रेती साठा चोरण्याची कार्यवाही करण्याची कुणाची हिंमत होणार नाही अशी मागणी होतं आहे.