Home महाराष्ट्र लक्षवेधी :- राजसाहेब, पुन्हा भाजपाच्या आमिषाला बळी पडू नका.

लक्षवेधी :- राजसाहेब, पुन्हा भाजपाच्या आमिषाला बळी पडू नका.

या महाराष्ट्रात तुमच्या रूपाने पुन्हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तयार होऊ नये म्हणून भाजपाचंचं छडयंत्र आहे हे समजून घ्या.

कर्मठ राज भक्तांचं मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना आवाहन.

लक्षवेधी :-

या महाराष्ट्रात सन 2012 मध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं दुःखद निधन झालं तेव्हापासून बाळासाहेबांचा वारसा कोण चालविणार यावर मते मतांतरे असली तर राज्यातील पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मराठी माणसांनी बाळासाहेबांचे खरे राजकीय वारस हे हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे हेच आहेत, कारण उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे कौटुंबिक दृष्ट्या वारस असले तरी राजसाहेब ठाकरे यांची देहबोली आणि त्यांच्यात असलेला बाळासाहेबांसारखा हजरजबाबीपणा यामुळे राज्याच्या राजकारणात बाळासाहेबांच्या विचारांची पोकळी भरून काढणारे व त्यांचा राजकीय वारसा पुढे नेणारे फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरे हेच एकमेव नेते आहेत यावर शिक्कामोर्तब झाले आणि राजसाहेब ठाकरे यांनी कडवट हिंदुत्वाची घेतलेली भूमिका हे त्याचेच द्योतक आहे हे स्पष्ट झाले, दरम्यान महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे यांच्या रूपाने दुसरा बाळासाहेब तयार होतोय, राजसाहेब ठाकरे यांच्या भाषणावेळी “माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो.” ही गर्जना झाल्यावर ज्या पद्धतीन टाळ्यांचा गडगडाट होतोय हिचं बाळासाहेबांची ओळख आहे आणि म्हणून जर राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे पक्षाचे किमान दहा आमदार जरी निवडून आले तरी महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे यांचे वर्चस्व निर्माण होणार आणि पुन्हा परत युती करिता त्यांच्याकडे पायाघड्या घालाव्या लागणार त्यापेक्षा राजसाहेब ठाकरे यांचे आमदार निवडून येऊचं द्यायचे नाही आणि त्यामुळे त्यांच्या पक्षाचा उदय होणार नाही हे तंत्र लक्षात घेऊन भाजप च्या रणणितीकारांनी रचलेला हा कट आहे हे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी समजून घेणे आवश्यक आहे.

राजसाहेब ठाकरेंच्या यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. मात्र, त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याचं गिफ्ट राजसाहेब ठाकरेंच्या मनसेला मिळेल आणि विधानसभा निवडणुकीत मनसेला महायुतीत काही जागा भाजप सोडेल अशी शक्यता होती, मात्र भाजपचं चित्र आणि चरित्र हे एवढं लबाड आणि संधीसाधू आहे की “गरज सरो आणि वैद्य मरो.” या वाक्याला सार्थक ठरत आहे, मागील लोकसभा निवडणुकीत राजसाहेब ठाकरे यांच्या चार जाहीर सभा ह्या महायुतीतील उमेदवारांना निवडवून आणण्यासाठी झाल्या आणि ते सगळे महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले. परंतु विधानसभा निवडणुकीत जेंव्हा मनसेला लोकसभेत केलेल्या समर्थनाची परतफेड करण्याची महायुतीला संधी होती तेंव्हा मात्र महायुतीतील एकनाथ शिंदे यांनी जाहीर विरोध केला तर फडणवीस यांनी माहीम विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांना मौखिक पाठिंबा देऊन वेळ मारून नेली आणि भाजपला जे अपेक्षित होतं ते त्यांनी साध्य केलं, मनसेची एकाही ठिकाणी जागा निवडून येऊ नये अशी रणणिती महायुतीतील फडणवीस व शिंदे यांनी आखली आणि मनसेच्या निवडून येणाऱ्या जागा त्यांनी छडयंत्र करून पाडल्या ही वस्तुस्थिती आहे, इकडे गोड बोलून मी तुमचेसोबत आहोत हे दाखवायचं आणि दुसरीकडे छडयंत्र करून उमेदवार पाडायचे ही भाजप विशेषता देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची रणणिती आहे हे स्पष्ट दिसत आहे, त्यामुळे आता राजसाहेब ठाकरे यांनी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप ने महायुतीत मनसेला घेण्याचा जो इरादा जाहीर केला तो फसवा आहे, अगोदरपासूनच मुंबईवर गुजराती नजर आहे आणि त्यामुळेच मनसेचा मुंबई मध्ये असलेल्या जनाधाराचा आपल्याला फायदा मिळावा आणि मनसेला विरोधात बोलण्याची संधी द्यायची नाही असे कटकारस्थान भाजप चे असू शकते.

भाजपचा मुंबई महानगर पालिकेवर डोळा ?

लोकसभा निवडणुकीत मनसेचे समर्थन मिळावे म्हणून शिवतीर्थावर राजसाहेब ठाकरे यांच्या घरचे उंबरठे झिजवीणाऱ्या भाजप नेत्यांनी आपलं काम झाल्यावर विधानसभा निवडणुकीत मात्र मनसेला दूर केलं, “काम झालं माझं आणि काय करू तुझं.” या युक्तीप्रमाणे भाजप नेत्यांनी मनसे सोबत गुलुगुलु करत राजसाहेब ठाकरे हे भाजप विरोधात बोलू नये याकरिता संधी साधली आणि मनसेच्या उमेदवारांना इव्हिएम मशीन च्या माध्यमातून सेटिंग करून पाडलं, विधानसभा निवडणूकीत भाजपला मोठं संख्याबळ मिळालं असल्याने एका मुंबई च्या व्यापाऱ्याने आता भाजपची सत्ता आली त्यामुळे गुजराती बोलावी लागेल मराठी चालणार नाही अशी सक्ती एका महिलेला केली होती त्या महिलेला घेऊन मनसे पदाधिकार्यानी मग त्या व्यापाऱ्यांची खरडपट्टी काढली खरी पण सत्ता आली की भाजप धार्जीने कसे माजतात त्यांचे हे मूर्तिवंत उदाहरणं आहे, दरम्यान आता मुंबई महानगरपालिका ही भाजप च्या मुख्य एजंड्यावर आहे नव्हे मुंबई महानगरपालिकेवर भाजप चा डोळा असून मोदी आणि अमित शहाला मुंबईत भाजप ची सत्ता हवी आहे, त्यामुळे आता मनसेला काही जागावर आमिष दाखवायचं आणि मुंबई काबीज करायची हा भाजपचा खरा डाव आहे तो राजसाहेब ठाकरे यांनी ओळखावा अन्यथा एकदा का मुंबई भाजप च्या हाती गेली तर पुढील अनेक वर्ष मनसे आणि शिवसेनेला इथे काहीही करता येणार नाही आणि मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात येईल त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजप मनसेला आमिष दाखवत आहे ते थोतांड आहे आणि राजसाहेब ठाकरे यांनी आपली ठोस भूमिका घेऊन मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वतःच्या बळावर लढवावी असे कर्मठ राज भक्तांचं मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना आवाहन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here