चंद्रपूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर भरण्यावर मोठी शास्ती सवलत – नागरिकांना संधी
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेने २०२५ वर्षासाठी मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. चंद्रपूर शहरातील मालमत्ता धारकांना १ जानेवारी २०२५ ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत एकमुस्त कर भरण्याबाबत शास्तीमध्ये विशेष सवलत देण्यात आली आहे. या कालावधीत कर भरणाऱ्या नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
पहिली सवलत:
दिनांक १ जानेवारी २०२५ ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत थकबाकीसह पूर्ण कर भरणाऱ्या नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने कर भरण्यासाठी ५० टक्के सवलत मिळेल. तसेच, ऑफलाइन पद्धतीने कर भरणाऱ्यांना ४५ टक्के शास्ती सवलत मिळेल. या सवलतीमुळे नागरिकांना कर भरण्याच्या प्रक्रियेत मोठा दिलासा मिळणार आहे.
दुसरी सवलत:
दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत, मालमत्ता धारकांना ऑनलाइन पद्धतीने कर भरण्यावर २५ टक्के सवलत मिळेल, तर ऑफलाइन पद्धतीने २२ टक्के सवलत मिळेल
पुढील वर्षासाठी सवलत:
सन २०२४-२०२५ या वर्षात डिसेंबर २०२४ पर्यंत जे मालमत्ता धारक शास्तीचा भरणा करणार आहेत, त्यांना त्यांची ५० टक्के शास्तीची रक्कम पुढील आर्थिक वर्षात समायोजित करण्यात येईल.
ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने कर भरण्याची सोय:
मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना चंद्रपूर महानगरपालिकेने सोपी आणि साधी पद्धती दिली आहे. इच्छुक नागरिक या लिंकवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने कर भरू शकतात. www.cmcchandrapur.com https://chandrapurmc.org//Pages/onlinePayment.aspx
चंद्रपूर महानगरपालिकेच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे नागरिकांना कर भरण्यात आणि शास्तीमध्ये मोठी सूट मिळणार आहे, याचा त्यांनी उपयोग करावा, असे आवाहन नगरपालिकेने केले आहे.