RTE प्रवेश 2025: पहिल्या फेरीतील निकाल जाहीर, पालकांसाठी महत्वाची सूचना!
चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्यातील RTE (बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम) अंतर्गत 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 185 शाळांमध्ये 25% आरक्षित जागांसाठी 1527 प्रवेश उपलब्ध होते. यासाठी 4015 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले, त्यात 1491 विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीत निवड झाली आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
निवड झालेल्या पालकांसाठी पुढील प्रक्रिया:
- अर्जाची स्थिती तपासा: पालकांनी student.maharashtra.gov.in या वेबसाइटवर अर्जाची स्थिती, मुळ निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तपासावी.
- कागदपत्रांची पडताळणी: निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून कागदपत्रांची पडताळणी करावी.
- प्रवेश निश्चित करा: 14 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची मूळ प्रती आणि साक्षांकित प्रती संबंधित शाळेत सादर करावीत.
- अलॉटमेंट लेटर: पालकांनी आपल्या लॉगिनवरून अलॉटमेंट लेटरची प्रिंट घेऊन शाळेत सादर करावी.
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी:
- निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्यानंतरच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना एसएमएस पाठवले जातील.
महत्वाची सूचना:
- अर्ज स्थिती तपासताना पोर्टल संथ होऊ शकते, त्यामुळे पालकांनी संयम ठेवून पुनःप्रयत्न करावा.
प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व कागदपत्रांची मूळ प्रती आणि साक्षांकित प्रती संबंधित शाळेत सादर करणे आवश्यक आहे.