पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी एलसीबी चे ठाणेदार कोंडावार यांच्या जागी त्यांची केली नियुक्ती, कोंडावर यांच्याकडे सोपवली आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी.
चंद्रपूर:-
जिल्ह्यात क्राईम रेट कमी करण्यासाठी व जनतेला न्याय मिळेल यासाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी अनेक उपाययोजना सुरु केल्या आहे, त्यातच त्यांचे प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये सुरु असलेले तक्रार निवारण केंद्र फिर्यादीना महत्वाचे ठरत आहे, दरम्यान बऱ्याच दिवसापासून पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे वारे सुरू असतानाच शुक्रवारी सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश जारी केले. एलसीबीचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांची आर्थिक गुन्हे शाखा तर त्यांच्या जागी भद्रावतीचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षभरात काचोरे यांची चौथ्यांदा बदली झाली आहे. दुर्गापूर येथील पोलिस निरीक्षक लता वाडिवे यांची भद्रावती येथे तर प्रभारी पोलिस उपाधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणारे पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांची दुर्गापुर पोलिस स्टेशनला बदली करण्यात आली आहे.
एलसीबीत वर्णी लावण्यासाठी अनेक पोलीस निरीक्षक शर्यतीत होते
जिल्ह्यातील प्रमुख गुन्ह्याचा शोध घेण्यास अग्रेसर असणाऱ्या एलसीबीत अनेकांनी आपल्याला त्या जागी नियुक्ती मिळावी म्हणून शर्यत लावली होती, कारण ठाणेदार महेश कोंडावार यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला होता, दरम्यान एलसीबीसाठी अनेक ठाणेदारांनी आपले सूत्र हलवले होते. त्यासाठी चार ते पाच ठाणेदारांची नावे एलसीबीसाठी चर्चेत पण होते, मात्र वरोरा येथे असतांना एका आरोपीने पोलीस कष्टडीत असतांना आत्महत्त्या केल्याच्या करणावरून पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांना जबाबदार पकडून त्याची तडकाफडकी बदली करण्यात आली होती, मात्र त्यात ते नंतर निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले होते त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली असून शुक्रवारी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी त्यांच्याकडे एलसीबी च्या पोलीस निरीक्षक पदाच्या कारभाराची सूत्रे सोपवली आहे.