श्रमिक मंथन या वृत्तपत्रात मोठा दावा, एसीबीने अटक केलेल्या मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभुतेचा खरा मोरक्या RTO मोरे च असल्याचा खुलासा?
RTO चा पंचनामा भाग -5
स्वतःला पारदर्शक काम करणारा अधिकारी आणि आपले कुठलेही चुकीचे कामे नसल्याचा आव आणणारे पण दुसऱ्याच्या खांद्यावर जबाबदारी देऊन भ्रष्टाचारात अव्वल स्थान निर्माण करणारे RTO अधिकारी किरण मोरे यांची चालाखी चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकारांनी चांगलीच ओळखली असून आता त्यांच्या भ्रष्टाचाराचे पंचनामे सुरु व्हायला लागले आहे, कित्तेक ट्रान्सपोर्ट संचालक किरण मोरेंना पाण्यात पाहत असून त्यांनी पण पत्रकारांच्या RTO कार्यालयातील भ्रष्टाचार विरोधातील बातम्याना समर्थन दिले आहे. दरम्यान काही ट्रक मालक पण आता जाहीरपणे सांगत आहे की ह्या RTO कार्यालयातील भ्रष्टाचारामुळे आमचे खूप मोठे आर्थिक शोषण होतं आहे, अशातच RTO च्या तेलंगना लक्कडकोट सिमा नाक्यावर अमरावती च्या एसीबी पथकाने 500 रुपये ट्रक चालकांकडून घेतांना मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक शिवाजी विभुते यांच्यासह एका खाजगी एजंट आला अटक केल्यानंतर त्यांचा खास मोटार वाहन निरीक्षक पवार यांना वाचविण्यासाठी आणि सोबतच स्वतःला पण अटक होईल या भीतीने RTO किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांनी एसीबीच्या पथकाला 50 लाख रुपये अटक न करण्यासाठी दिले असल्याचा सनसनिखेज खुलासा श्रमिक मंथन या वृत्तपत्राने केल्यामुळे ट्रान्सपोर्ट क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) पोलीस अधीक्षक दिगांबर प्रधान यांच्याकडे एका ट्रान्सपोर्टर तक्रार करून RTO च्या तेलंगना सिमा नाक्यावरील लक्कडकोट येथील कार्यालयात एंट्री फी च्या नावावर खुलेआम पैसे घेत असल्याचे सांगून तिथे ट्रॅप लावण्यात आला, ही जबाबदारी चंद्रपूर च्या एसीबी टीम ला न देता अमरावती येथील टीम ला देण्यात आली, ठरल्याप्रमाणे ट्रॅप यशस्वी झाला आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभुते आणि एका खाजगी एजंट ला एसीबी च्या पथकाने 500 रुपये घेतांना रंगेहात पकडले, मात्र या दरम्यान मोटार वाहन निरीक्षक पवार फरार होण्यात यशस्वी ठरले होते, दरम्यान लक्कडकोट येथील तेलंगना सिमा नाक्यावर होतं असलेली अवैध वसुली ही RTO किरण मोरे आणि आंनद मेश्राम या अधिकाऱ्यांच्या आदेशाने होतं होती हे त्रिकालाबाधित सत्त्य आहे त्यामुळे त्या एसीबी च्या ट्रॅप मध्ये RTO किरण मोरे आणि आंनद मेश्राम हे अधिकारी पण आरोपी आहेत त्यामुळे त्यांना अटक करणे आवश्यक होते मात्र स्वतःची व आपल्या अधीनस्त अधिकाऱ्यांची सुटका करून घेण्यासाठी मोरे यांनी अमरावती च्या एसीबी पथकाला 50 लाख दिल्याचा दावा श्रमिक मंथन या वृत्तपत्रात केला तो खरोखर वाटायला लागला असून या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पदाधिकारी हे लवकरच एसीबी चे पोलीस महासंचालक यांच्याकडे पुराव्यासह तक्रार देऊन किरण मोरे आनंद मेश्राम आणि पवार यांना अटक करण्याची मागणी करणार असल्याची माहिती हाती आली आहे.
एसीबी ने 50 लाख घेतल्याचा तपास कोण करणार?
अमरावतीच्या एसीबी पथकाने RTO अधिकारी किरण मोरे आणि आंनद मेश्राम यांच्या लाचखोरीचा पर्दापाश केला खरा पण त्यांनी अटक न करण्यासाठी मोरे कडून 50 लाख घेतल्याचा दावा श्रमिक मंथन या वृत्तपत्राने केल्यामुळे आता याची चौकशी कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान हा पैसा अमरावती च्या एसीबी टीम ने घेतला की पोलीस अधीक्षक दिगांबर प्रधान यांच्या सांगण्यावरून घेतला? हे सध्या गुलदास्त्यात असलं तरी RTO च्या भ्रष्टाचाराचा संपूर्ण पाढा मनसे वाहतूक सेनेचे पदाधिकारी मुंबई येथील पोलीस महासंचालक (एसीबी) यांच्याकडे मुंबई च्या पदाधिकाऱ्यांना घेऊन वाचणार असल्याने “अब तेरा क्या होगा?” असं म्हणण्याची वेळ येणार असल्याची शक्यता वर्तवली जातं आहे.