महिला दिनानिमित्त लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हफ्ता एकत्र जमा, ५ ते ८ मार्च दरम्यान
आदिती तटकरे यांची घोषणा, अर्थ संकल्पानंतर मार्चचा हफ्ता दिला जाईल
मुंबई :- महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना अंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता ५ मार्चपासून ते ८ मार्च दरम्यान महिला आणि बालविकास खात्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे. महिला दिनानिमित्त हा निर्णय घेतला असून, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हफ्ते एकत्र दिले जातील. मार्च महिन्याचा हफ्ता, अर्थ संकल्प बजेट प्रस्तुत झाल्यानंतर, अधिवेशनाच्या कालावधीत उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
News reporter :- अतुल दिघाडे
आदिती तटकरे यांनी याबाबत सांगितले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार विविध उपक्रम राबवते आहे. विशेषतः, लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक सहाय्य पुरवून त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने एक मोठा फायदा होईल.
महिला आणि बालविकास मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. महिलांनी आपल्या जीवनातील विविध अडचणींवर मात करण्यासाठी या योजनेचे स्वागत केले आहे.
सरकारचे हे निर्णय महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाची पावले ठरली आहेत, ज्यामुळे महिलांना केवळ आर्थिकच नव्हे, तर सामाजिक आणि मानसिक दृष्टिकोनातूनही लाभ मिळणार आहे.